प्रतींनिधी म्हसळा लाईव्ह
रायगड जिल्ह्यातील 12 तालुक्यांमधील 313 गाव-वाड्यांमध्ये पाणी टंचाईचा झळा जाणवत आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थ, महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेत. टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 33 टँकर्स व 4 अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे येथील 62 हजार 479 नागरिकांना थोडाला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील 15 पैकी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरुड आणि तळा या बारा तालुक्यांमधील एकूण 74 गावे, 239 वाड्या असे मिळून एकूण 313 गाव-वाड्यांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती आहे. यामध्ये पोलादपूर आणि पेणमधील सर्वाधिक गावे आहेत. येथील नागरिकांना 31 खाजगी, सामाजिक संस्थेच्यामदतीने दोन असे 33 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे.
यामध्ये उरण तालुक्यातील 5 वाड्यांमधील 998 नागरिकांना 2 खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील 5 गावे, 6 वाड्या अशा एकूण 11 गाव-वाड्यांमधील एकूण 4 हजार 805 नागरिकांना दोन खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कर्जत तालुक्यातील 3 गावे, 10 वाड्या अशा एकूण 13 गाव-वाड्यांमधील एकूण 1 हजार 560 नागरिकांना दोन खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खालापूरातील 1 गाव, 4 वाड्या अशा एकूण 5 गाव-वाड्यांमधील एकूण 1 हजार 550 नागरिकांना एक खाजगी टँकर व दोन अधिग्रहित विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पेण तालुक्यातील 14 गावे, 86 वाड्या-एकूण 100 गाव-वाड्यांमधील एकूण 22 हजार 250 नागरिकांना 7 खाजगी टँकर्स व एका मदतीच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सुधागड तालुक्यातील 3 गावे, 5 वाड्या अशा 8 गाव-वाड्यांमधील 2 हजार 262 नागरिकांना एका खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील 4 गावे, 2 वाड्या-एकूण 6 गाव-वाड्यांमधील एकूण 2 हजार 896 नागरिकांना सामाजिक संस्थेच्या मदतीच्या एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महाड तालुक्यातील 10 गावे, 62 वाड्या अशा एकूण 72 गाव-वाड्यांमधील एकूण 12 हजार 211 नागरिकांना 7 खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील 30 गावे, 57 वाड्या एकूण 87 गाव-वाड्यांमधील एकूण 11 हजार 230 नागरिकांना 6 खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील 1 गाव, 2 वाड्या एकूण 3 गाव-वाड्यांमधील एकूण 348 नागरिकांना एका खाजगी टँकर व 2 अधिग्रहित विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मुरुड तालुक्यातील एका गावातील एकूण 751 नागरिकांना एका खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तळा तालुक्यातील दोन गावांतील एकूण 1 हजार 618 नागरिकांना एका खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Post a Comment