माणगावजवळ कार साईडपट्टीवरुन उलटली; 1 ठार 1 जखमी



सलीम शेख/माणगाव : मुंबई - गोवा महामार्गावर माणगावपासून 13 किमी अंतरावर असणार्‍या लाखपाले गावच्या हद्दीत वॅगनार कार रस्त्याच्या साईडपट्टीवरुन उलटली. या अपघातात 1 ठार तर 1 जण जखमी झाला. आज (18 मे) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

भांडुप ठाणे येथून चिराली ता.खेड याठिकाणी निघालेली वॅगनार कार सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास माणगावजवळील लाखपाले गावाच्या हद्दीत आली. मात्र चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार साईडपट्टीवरून उलटली. या अपघातात जयराम भागोजी भुरटे (वय 75, रा.भांडुप ठाणे, मूळ गाव चिराली ता. खेड) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा संतोष जयराम भुरटे (वय 43) हा जखमी झाला. 

जखमी संतोष भुरटे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एन.सी. रसाळ हे करीत आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा