म्हसळा(निकेश कोकचा)
कोविंड 19 कोरोना या विषाणूं संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून म्हसळा नगरपंचायत हद्दीतील सर्व दुकाने 4 एप्रिल ते 6 एप्रिल पर्यन्त पूर्णवेळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हा निर्णय दवंडी देऊन संपूर्ण शहरामध्ये सांगण्यात आला आहे.
या बंद मध्ये मेडिकल दुकाने,रेशनिंग दुकाने हे पूर्णवेळ चालू राहतील तर दूध विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत चालू असणार आहेत.या दुकानांव्यतिरिक्त शहरातील किराणा,भाजी व इतर सर्व दुकाने 6 एप्रिल पर्यन्त बंद राहणार असल्याची माहिती नगराध्यक्षा जयश्री कापरे यांनी दिली.
Post a Comment