कोरोना पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदितीताई तटकरे यांची तळा तालुक्याला सदीच्छा भेट.


कोरोना पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदितीताई तटकरे यांची तळा तालुक्याला सदीच्छा भेट.गाफील राहु नका खबरदारी घ्या- पालकमंत्री अदितीताई तटकरे

तळा (किशोर पितळे)
सद्या जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून श्रीवर्धन मतदार संघातील विद्यमान आमदार तथा पालकमंत्री मा.अदितीताई तटकरे यांनी तळा तालुक्यातील शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जात आहे याची पहाणीकरण्याच्या दृष्टीने रायगड जिल्हाच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे शुक्रवारी तळा तालुका दौऱ्यावर आल्या असता त्यांनी तालुक्यातील कोरोना याआजारा संदर्भात आढावा घेऊन उपयुक्त सुचना दिल्या.त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाकडुन सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी प्रकल्पाला भेट दिली यावेळीत्यांच्या समवेत तहसिलदार श्री.अण्णापा कनशेट्टी, पोलीस निरीक्षक श्री.सुरेश गेंगजे, नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, मुख्याधिकारी माधुरी मडके माजी जिल्हा प्रमुख रवीभाऊ मुंढे, नगरसेवक चंद्रकांत रोडे, मंगेश शिगवण, नगरसेविका स्नेहल तळकर,पत्रकार संजय रिकामे, किशोर पितळे विराज टिळक,महेंद्र कजबजे,राजाराम तळकर आदि मान्यवर उपस्थित होते
          एखादी व्यक्ती जेव्हा बाहेरच्या देशातुन येते तेव्हा त्या व्यक्तीस नेमके कुठे ठेवले जाते त्यासाठी आयसोलेशन व काँरेंटाईन कक्ष कशा पध्दतीने तयार करण्यात आले आहेत त्या कक्षात नेमकी काय खबरदारी घेतली जाते याचाआढावाघेतलात्याचप्रमाणे आयसोलेशन व काँरेंटाईनसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचा वापर आपण करुशकतात्यासाठी प्रशासन स्तरावर सुचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. अन्नपुरवठा व संरक्षण भागाद्वारे राज्यातील गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्या जनतेसाठी सवलतीच्या दरात शिवभोजनथाळी केंद्र योजना १ एप्रिल पासून सुरू करण्यात आली असूनपाच रुपयात शिवभोजन थाळी या शासनाच्या योजनेस त्यांनी भेट देऊन आढावा घेतला व सोशल डीस्टन्सिंग पाळण्या बरोबरच हँडवाॅशने हात स्वच्छ धुतल्यानंतरच थाळी वाटप करण्याच्या सुचना दिल्या व दैनंदिन थाळीमध्ये वाढ करुन दिली.
           कोरोना आजाराबद्दल सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती आणि गैरसमज आहेत परंतु या आजाराबद्दल भिती बाळगण्याचे कारण नसले तरी सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे महाराष्ट्र सध्या दुसरया फेज वरुन जात असुन कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराला परतवुन लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.नागरिकांनी घरात रहावे बाहेर पडु नका,सुरक्षितअंतरठेवा.आपणस्वतःचे स्वतः रक्षक बना असा संदेश दिला खबरदारी घ्या. कामा व्यतीरिक्त फिरू नका प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालनकरा.शासनाकडुन करण्यात येणारया सर्व सुचनांचे योग्य ते पालन व्हावे, द्वेष भावनेतुन कुणीही अफवा पसरवु नये  घाबरून जाऊ नका अशा सुचना पालकमंत्री अदितीताई तटकरेयांनीकेल्या.तळा तालुक्यातील परिस्थिती पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले व गाफील राहु नका खबरदारी घ्या अशा सुचना अधिकाऱ्यांंना दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा