सोबत फोटो-पोलिस समर्थ सांगले यांच्याकडून केरीबाई धर्मा पाटील या आज्जीला जीवनावश्यक वस्तु देऊन पोलिस गाडी मध्ये गावी रवाना करताना दिसत आहेत.
ऐंशी वर्षीय आज्जीने मुंबईहून पायी चालत गाठला म्हसळा : पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत गाडीतून पाठवले घरी: तालुक्यात मुंबईहून दहा हजार जन आल्याची शक्यता?
म्हसळा( निकेश कोकचा )
संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणू बाबत दहशत निर्माण झाली असून,याचा परिणाम मुंबई येथे कामानिमित्त असणार्या गावागावातील नागरिकांवर देखील झाला असल्याचे निदर्शनात येत आहे. गावी येण्याचे कोणतेही साधन नसल्याने सतत तीन दिवस पायी चालत एका 80 वर्षीय आज्जीणे थेट मुंबई ते म्हसळाचे अंतर गाठल्याची थरारक घटना घडली आहे.
कोरोनाच भीतीने नेहमी गजबजलेला मुंबई शहर ओस पडत चालला असून गड्या आपला गावच बरा असे म्हणत लोक गावाकडे जाण्यासाठि धडपडत आहेत.केंद्र सरकारने 21 दिवसाचे लॉक डाउन जाहीर केल्याने देशभरातील सरकारी व खासगी ट्रान्सपोर्ट सेवा बंद करण्यात आली आहे.तेव्हा मिळालं त्या साधनाने अथवा पायी चालत स्वतचे गाव गाठण्यात येत आहे.मुंबई राहणार्या केरीबाई धर्मा पाटील अंदाजे वय 80 वर्ष यांनी नेरूळ मुंबई येथून पायी चालत म्हसळा तालुक्यातील मेंदडी गाव गाठण्याचा निश्चय केला.गुरवारी ह्या आज्जीबाई म्हसळा दिघी नाक्यावर पोहचल्यावर पोलिसांनी चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला.यानंतर दिघी नाक्यावर कार्यरत असणारे समर्थ सांगले या पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत स्वखर्चाने या आज्जीला जीवनावश्यक वस्तु भेट देऊन, तिच्या गावी म्हणजे मेंदडी येथे पोलिस गाडीतून सोडण्यात आले.पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीचा संपूर्ण संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.
मुंबई येथून म्हसळा तालुक्यात पायी चालत,खाजगी वाहनाने अथवा चोराटी पद्धतीने मागील काही दिवसांमध्ये दहा हजार जन आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.प्रशासनामार्फत या सर्वांचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटईन चे शिक्के मारून चौदा दिवस घरी राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Good job Maharashtra police 🙏🙏🙏🙏
ReplyDeletePost a Comment