लॉक डाऊन असताना दारू विक्री : दिघी सागरी पोलीसानी केला गुन्हा दाखल.
.५ लक्ष२३ हजार २६६ ची दारू जप्त.
( म्हसळा प्रतिनिधी )
देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूचा संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासनाने १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन ठेवण्यात आला असतानाही दिघी सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल साईश्री परमीट रुम , बार मध्ये बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याची माहीती दिघी सागरीचे सपोनी महेंद्र शेलार याना खबऱ्याकडून मिळाल्यामुळे दिघी सागरी पोलिसानी साईश्री परमीट रूम
मध्ये डमी गीऱ्हाईक पाठविला असता आरोपी ओंकार महादेव रेळेकर याला पोलीसानी अनधिकृत रीत्या रंगेहाथ दारु विक्री करताना पकडला. यावेळी रेळेकर यांचे जवळ रु५,२३, २६६ किमतीच्या बिअर, विदेशी दारुच्या सीलबंद बाटल्या जप्त केल्या.प्रकाश भिकाजी सुर्वे पोशि ८९८याने दिधी सागरी पो.स्टेशन मध्ये फिर्याद दिल्याने पोलीसानी प्रोही. गुन्हा रजी. नं.१६ /२०२० मुंबई प्रोव्हािशन अॅक्ट कलम ६५ खंड ( ई ), ८२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. राज्यात कोरोना विषाणूचा संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासनाने १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन ठेवण्यात आला असताना व या बंद कालावधीत संपुर्ण रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी साहेब रायगड यानी बार व परमीट रूम व दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देऊनही आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सदरचा गुन्हा दिधी सागरी पोलिसानी दि. ९.४.२०२० ला नोंदविला.सदर गुन्ह्याचा तपास सपोनी महेंद्र शेलार यांचे मार्गदर्शनाखाली पो.ह.१८५६ जागडे करीत आहेत. गुन्ह्या कामी ७९६ पो.ना.चव्हाण,पो.ना.७६८ सोनावणे, पो.शी.१९७४ सांगळे, पो.शी.५६४ शिंदे, म.पो.शी.२५१ वाळुंज यानी विशेष मदत केली.
Post a Comment