श्रीवर्धन नगरपरिषदेची कोरोना विरोधात आघाडी ; सर्वत्र फवारणी व जनजागृतीला प्राधान्य


श्रीवर्धन नगरपरिषदेची कोरोना  विरोधात आघाडी : सर्वत्र फवारणी व जनजागृतीला प्राधान्य ; शिवाजी चौकात निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना 

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

कोरोना विषाणू ने संपूर्ण देशात थैमान घातले आहे अशा प्रसंगी सरकार व सर्व प्रशासकीय विभाग  सर्वस्व पणाला लावून मोठया जिद्दीने काम करत आहेत .सरकारी आदेशाचे पालन करण्याचे दायित्व प्रत्येक कर्मचारी वर्ग मोठया शिताफीने करताना दिसतोय .श्रीवर्धन नगर परिषदेचा सर्व कर्मचारी वर्ग  संपुर्ण शक्तीनिशी कोरोनाचा सामना करताना दिसत आहे .श्रीवर्धन शहरातील मुख्य रस्त्यावर   "तू रस्त्यावर आलास, तर मी तुझ्या घरात येईल, व  "घरातच रहा ,सुरक्षित रहा  अशी मार्मिक व लक्षवेधी वाक्य लिहली आहेत .रस्त्यावरून जाणार प्रत्येक व्यक्ती आवर्जून वाचेल व त्याच्या मनात निश्चितच आपल्या वर्तनात बदल होईल अशी अपेक्षा आहे .नगरपालिकेच्या माध्यमातून श्रीवर्धन   शहराच्या शिवाजी चौकात कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे .श्रीवर्धन मध्ये अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी कामावर जाताना व कामावरून घरी जाताना निर्जंतुकीकरण गरजेचे आहे त्यासाठी सदर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे .नगरपालिकेच्या फ़ायरब्रिगेड च्या गाडीचा उपयोग श्रीवर्धन शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी फवारणी साठी केला जात आहे .नरेश काप वाहन चालक ,रुपेश श्रीवर्धनकर फायरमन , प्रल्हाद  पडवळ ,विकास नागवेकर ,सुयोग आगरकर, विशाल भुसाने ,नयन चोगले ,प्रसाद कडू ,अजित श्रीवर्धनकर तसेच प्रशासकिय अधिकारी   अमोल नप्ते ,आरोग्य विभाग प्रमुख  प्रणय ठाकुर  निवास गुरव, प्रसाद डोंगरे, आणि  विनायक चौगुले  मोठ्या उत्साहात कामगिरी बजावताना दिसत आहेत .सदरचे कर्मचारी सकाळी ०७ला घरा बाहेर पडतात ते रात्रीच उशिरा पर्यंत घराच्या बाहेरच  असतात .सर्वसामान्य माणूस सुरक्षित रहावा या हेतूने प्रेरित होऊन सर्व कर्मचारी काम करताना दिसत आहेत .
आजमितीस श्रीवर्धन शहर व तालुका सर्व ठिकाणी नगरपरिषदेचा कर्मचारी मोठया उत्साहाने कोरोना विरोधाच्या लढाईत लढत आहे .सर्वसामान्य जनतेचे आरोग्य चांगले राहावे व सर्व लोकांना कोरोना पासून दूर ठेवावे अशी आमची इच्छा आहे .जनतेने सहकार्य करावे ही अपेक्षा आहे ...
-किरणकुमार मोरे (मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा