अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - पालकमंत्री ना.आदिती तटकरे

अलिबाग- जिल्ह्यातील महाड,श्रीवर्धन व माणगाव, म्हसळा यासह अनेक तालुक्यात काल (दि.11राेजी)  झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बऱ्याच ठिकाणी भात, आंबा, काजू, सुपारी बाग आदी पिकांसंबंधी नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश जिल्हयाच्या पालकमंत्री ना. कु. आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

     करोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने जगात आधीच मोठे संकट उभे राहिले आहे. त्यात काल (दि.11 राेजी) राज्यासह रायगड जिल्ह्यातदेखील काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतपिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.     
 
     कोकणातील भात, आंबा, काजू, सुपारी बाग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडून घरांची पडझड झाली आहे. 

      या सर्वांची नुकसान भरपाई लवकर मिळवून देण्यासाठी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री ना.कु. आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा