म्हसळा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु
जिवनावश्यक वस्तूंचा मुबलक पुरवठा :भावात २०% वाढ.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात लॉकडाऊन काळात राज्यात कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय कार्डधारक २०७३ व प्राधान्य कुटुंब लाभार्थी ११९११ असे दोन्ही रेशनकार्डमधील १३, ९८४ लाभार्थ्यांना बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड १५ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २रु किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो.त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉक डाऊनमुळे तालुक्यात असलेल्या शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य दिले जात आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने केल्या प्रमाणे त्याचेही वितरण सुरु झाले आसल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात आले.
"तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंचा कोणताही तुटवडा नाही, A.P.M.C Market वाशी हून येणाऱ्या गाडयांचे प्रमाण व फेरे कमी होत आसल्याने भाडेवाढ झाली आहे ,सांगली मार्केट यार्ड मधून थोडी बहुत आवक होत आहे भाडेवाडी मुळे १५ते २० % दरवाढ झाली आहे."
नंदूशेठ सावंत, अध्यक्ष किराणा व्यापारी संघटना, म्हसळा
जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई.
" तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.तालुक्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीबाबत तक्रार आल्यास ,वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. रास्त भाव धान्य दुकाना बाबत तक्रार आल्यास संबधीत दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल."
के.टी. भिंगारे, निवासी नायब तहसीलदार
Post a Comment