जमातुल मुस्लिमीन समाज मेंदडी तर्फे गरजूंना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप


म्हसळा(निकेश कोकचा)
कोरोनाचे संकट संपुष्ठात आणण्यासाठी संपूर्ण भारतात 21 दिवसाचे लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे.यावेळी हातावर पोट असणारे व निराधारांचे व गरिबांचे जनजीवन संपूर्ण विस्कळीत झाले आहे.या सर्व निराधार व गरजूंना मदतीसाठी म्हसळा तालुक्यातील जमातुल मुस्लिमीन समाज मेंदडी तर्फे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
जमातुल मुस्लिमीन समाज मेंदडी तर्फे तालुक्यातील वरवटने मुस्लिम मोहल्ला,खरसई मुस्लिम मोहल्ला,मेंदडी मुस्लिम मोहल्ला,मेंदडी आगरी समाज,मेंदडी कोळी समाज,मेंदडी कोंड आगरी समाज,वारळ मुस्लिम मोहल्ला,भावा मुस्लिम मोहल्ला,मेंदडी बौद्ध वाडी,आदिवासी वाडी,आगरवाडा,तुरुंबाडी कोळी समाज येथील शेकडो हातावर पोट असणारे, निराधार व गरजूं नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.यावेळी समाज अध्यक्ष मुहिबुल्ला नजीर,उपाध्यक्ष इरफान नजीर,सेक्रेटरी मझर नजीर,सदस्य अर्षद नजीर,झुल्फी नजीर,जमीर नजीर,तनवीर नजीर,अमीर उकये,सुफीयान मुकादम यांच्यासहित अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा