जिल्ह्यातील मुंबईकर जनतेचे मला आभार व माफी मागायची आहे - अनिकेत तटकरे




जिल्ह्यातील मुंबईकर जनतेचे मला आभार व माफी मागायची आहे. या लॉकडाऊनच्या कठीण काळात काही मुंबईकरांना पायी चालत आपल्या गावी यावं लागलं. नियमांचे पालन करताना प्रशासनाकडून काही ठिकाणी अडवणूक झाली. जेवणाचे हाल झाले. केंद्र व राज्य शासनाचे कठोर निर्बंध असल्याने आम्हालाही एका मर्यादेवर आपल्याला मदत करता आली नाही, याची खंत वाटते. त्यासाठी मी अंतःकरणापासून दिलगीरी व्यक्त करतो.
काही ठिकाणी त्यांच्या गावांमध्ये, घरांमध्ये त्यांना प्रवेश देण्यास गावकऱ्यांनी नकार दिला तेव्हा अशा मुंबईकरांची आरोग्य तपासणी करून त्यांना समाजमंदिरं, शाळा अशा ठिकाणी क्वारन्टाईन करण्याचा आम्ही निर्णय घेतला. तळा, म्हसळा, श्रीवर्धन येथील तहसीलदारांशी चर्चा केल्यानंतर अशा चालत आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही करत आहोत. जवळपास ५००० लोकांपर्यंत अन्नधान्य पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सर्वांनाच समाधानी करणे आम्हाला शक्य होईल असे नाही. पण यथाशक्ती मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. आपल्या सुख-दुःखात आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.
अनिकेत तटकरे , आमदार विधानपरिषद , कोकण स्थानिक स्वराज्य संस्था

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा