संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
कुठल्याही रोगाच्या बहुव्यापी साथीत भेदरलेल्या समाज मनातून उमटलेल्या राजकीय-सामाजिक भावनांचा यावेळी श्री धावीर देव मान राखणार व देशावर तसेच महाराष्ट्र राज्यावर आलेले कोव्हीड-19 कोरोना विषाणूचे संकट परतणार यासाठी आम्ही म्हसळाकर "घरीच रहाणार सुरक्षित राहाणार" या भावनेतून म्हसळा येथील उद्या होणारी श्री धावीरदेव यात्रा ही केंद्र व राज्याने दिलेल्या कायद्याच्या चौकटीतच होणार असल्याची स्पष्ट भावना म्हसळा हिंदू समाजाचे अध्यक्ष सुभाष उर्फ बाळशेट करडे,विश्वस्त सुनील उमरठकर यानी व्यक्त केली. यात्रेचे स्वरूप केवळ धार्मिक उत्सव स्वरुपांत C.R.P.C 144 चे व सोशल डीस्टंसचे भान राखत होणार आहे . कोणतीही वाद्य वाजंत्री वाजविली जाणार नाहीत, असेही उमरठकर यानी सांगितले , बहुतांश तालुक्याची ग्रामदेवता असणाऱ्या श्री धावीर देव यात्रा उत्सवाला सुमारे १३५ वर्षानंतर खंड पडत आसत्याचे सांगण्यात आले, त्या काळात स्थानिक वतनदार -सालकरी मंडळीनी यात्रोत्सव न करता धार्मिक पध्दतीने श्री धावीर देवाचे पूजन व देवाला नवस केला होता आशी आख्यायिका आहे. मंदीराचे अन्य विश्वस्त नंदू गोवीलकर, योगेश करडे, सुनील अंजर्लेकर, सुशिल यादव, भास्कर जोशी, गणेश हेगीष्टे आहेत.
Post a Comment