टंचाई आराखड्यात रायगड जिल्ह्यातील ५ तालुक्यांसाठी ४४ विंधण विहीरीना मंजुरी.


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव, तळा, म्हसळा, व श्रीवर्धन या ५ तालुक्याना ४४ विंधण विहीर खोदाईला रायगड जिल्हाधिकारी यानी मंजुरी दिली आहे. त्या पुढील प्रमाणे रोहा तालुका३गावे५वाड्यांसाठी ८ विंधण विहीरी, माणगाव तालुका ३ गावे ७ वाड्यांसाठी१० विंधण विहीरी,तळा तालुका २ गावे १०वाड्यांसाठी१२ विंधण विहीरी, म्हसळा तालुका ४ गावे ४ वाड्यांसाठी ८ विंधण विहीरी,श्रीवर्धन तालुका १ गावे ५ वाड्यां साठी ६ विंधण विहीरी, अशा एकूण१३ गावे ३१ वाडयांमध्ये ४४ विंधण विहीरी जिल्हाधिकारी रायगड यानी मंजुर केल्या आहेत. तालुका निहाय गावे व वाडया पुढील प्रमाणे.रोहा तालुका देव न्हावे गावदेवी मंदीर, देवन्हावे व देवन्हावे अशी ३ गावे , सुडकोली खडकवाडी, सारसोली बौद्धवाडी, कोकबन आदिवासी वाडी,तांबडी बकम्माची वाडी, भिसे राजेवाडी ५ वाड्यांसाठी ८ विंधण विहीरी, माणगाव तालुका बामणोली, कडापूर, नगरोली ३ गावे, वडगाव , कुरकडे,वडघर, बोरघर (बौध्दवाडी) थरमरी, गांगवली काते ( आदीवासी वाडी) या ७ वाड्यांसाठी १० विंधण विहीरी, तळा तालुका ताम्हणे,भानंग ही २ गावे मेंढे, बोरघर,वांजळोशी (आदीवासी वाडी), रोवळा, केळशी, काकडशेत, कळसांबडे, बोरघर ,दहिवली (बौध्दवाडी),१० .वाड्यांसाठी १२ विंधण विहीरी,म्हसळा तालुका वारळ ग्रामपंचायत,तुरूंबाडी, खारगाव बुद्रुक, खारगाव खुर्द ४ गावे, कृष्णनगर,चिचोंडे , तोराडी, (आदीवासी वाडी), तोराडी कुणबी वाडी४ वाड्यांसाठी ८ विंधण विहीरी,श्रीवर्धन तालुका कारविणे१ गाव, वडवली (एस.टी. स्टँड जवळ, भाडखोल हायस्कुल,वावे (सावंतवाडी )वावे,आदीवासी वाडी,गालसुरे जाखमाता नगर या ५ वाड्यां साठी ६ विंधण विहीरी मंजुर केल्या आहेत.अशा एकूण१३ गावे ३१ वाडयांमध्ये ४४ विंधण विहीरी जिल्हाधिकारी रायगड यानी मंजुर केल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा