तळा (किशोर पितळे)
कोरोना या घातक संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाउन करण्यात आले आहे. सर्वांना घरातच थांबण्याचे आदेश दिले आहेत.डॉक्टर,नर्सेस, पोलीस व आरोग्य विभाग आणि इतर महत्व पूर्ण यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढाईत काम करत आहेत.तसेच या लढाईत रास्त भाव धान्य दुकानदार सहभागी होऊन आपला जीव धोक्यात घालून इतरांची उपासमार होऊ नये म्हणून अन्न धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम करीत आहेत. सध्याच्या या भयानक परिस्थितीत सर्वजण आपला जीव वाचविण्यासाठी आपापल्या घरात बसलेले असताना सर्व रास्त भाव दुकानदार आपल्या दुकानात अनेक शिधापत्रिका धारकांच्या संपर्कात येऊन आपला जीव धोक्यात घालून धान्य दुकानदार धान्य वाटप करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था किट्स,मास्क, हॅन्डग्लोज,सॅनेटाईजर यासारखे साहित्य देण्यात आलेले नाहीत. ते स्वतः आपला जीव धोक्यात घालून विना शस्त्र या भयानक लढाईत प्रामाणिकपणे लढत आहेत.याची दखल घेत रायगड जिल्हा प्रेस क्लब संलग्न तळा प्रेस क्लब व मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने रास्तभाव धान्य दुकानदारांस मास्क,हँडग्लोज आणि सॅनिटाईजर वाटप करण्यात आले यावेळी तळा प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय रिकामे,उपाध्यक्ष किशोर पितळे,सचिव संध्या पिंगळे माजी अध्यक्ष कृष्णा भोसले,सल्लागार पुरुषोत्तम मुळे रास्तभाव धान्य संघटना तळा तालुका अध्यक्ष जनार्दन भौड,रमण कोलवणकर,संतोष ठसाळ आदि मान्यवर उपस्थित होते.
- कोरोना या महाभयंकर रोगावर लढण्यासाठी जागतिक स्तरावर काम सुरु आहे.अजुनही या रोगावर लस उपलब्ध झाली नसुन काळजावर दगड ठेऊन कुटुंबाला बाजूला सारून सामाजिक बांधिलकी जपत रास्तभाव धान्य दुकानदार धान्य पुरवठा करण्यासाठी बाहेर पडतो लोकांची उपासमार होऊ नये म्हणुन रास्तभाव दुकानदारांचे योगदानही अनमोल असुन त्यांच्या कार्याची दखल तळा प्रेस क्लबच्या वतीने घेण्यात आली आणि दुकानदारांस मास्क,हँडग्लोज आणि सॅनिटाईजचे वाटप करण्यात आल्याचे तळा तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय रिकामे यांनी यावेळी सांगितले.
संघटनेचे अध्यक्ष जनार्दन भौड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आज पर्यंत रास्तभाव धान्य दुकानदार यांची कोणीही दखल घेतली नाही तळा तालुका प्रेस क्लबने आमच्या कामाची दखल घेऊन आज मास्क हँडग्लोज आणि सॅनिटाईजचे वाटप केले आहे त्याबाबतीत संघटनेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.शासनाने दिलेल्या निकषांनुसार तळा तालुक्यात धान्याचे वाटप होत आहे.वाटप करत असताना तांत्रिक अडचणी आहेतच परंतु काही ठिकाणी रेंज नसल्याने त्याचाही त्रास होत आहे.केवळ त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, केशरी कार्ड धारकांसाठी देखील शासनाच्या आदेशा प्रमाणे धान्य वाटप सरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दुकानदार दुकान चालू ठेवून तुटपुंज्या कमीशनवर एक प्रकारे व्यवसाय नव्हे तर सामाजिक कार्य करत आहेत.दुकानदारांनाहि संवेदना व माणुसकी आहे, ते सुद्धा सामान्य परिस्थितीतूनच आहेत.काहीजण दुकानदारां विरुद्ध फक्त खोटी प्रसिद्धीमिळवण्यासाठी खोटे आरोप करून बदनामी करत असल्याचे दिसत असताना तळा प्रेस क्लबने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Post a Comment