"गाव करील ते राव काय करील"..समाजासमोर ठेवला आदर्श.
तळा( किशोरपितळे)
तळा शहरातील परीटवाडा येथील सुतार आळी येथील ग्रामस्थांनी शासनाच्या मदती वीना गावातील पाणी समस्येवर बोअरवेल खोदुन मात केली आहे त्यातुन पाण्याची समस्या मार्गी लागल्याने" गाव करिल ते राव काय करील",या उक्तीचा प्रत्यय ग्रामस्थांनी दाखवुन दिला आहे सुतार आळी ग्रामस्थ मंडळीतील लोकवर्गणीतून व स्वदेश फाऊंडेशनचे माध्यमातून तळा शहरातील सुतारआळी ग्रामस्थांनी पाणी समस्येवर मात करण्यासाठी स्वतः वर्गणी काढुन आळी शेजारील भागात बोअरवेल मारुन ग्रामस्थांसाठी मुबलक पाणी उपलब्ध करुन पाण्याची समस्या निकाली काढली आहे स्वतःचा प्रश्न स्वतः सोडविण्यासाठी ग्रामस्थांनी एकीची वज्रमुठ तयार करुन आपला प्रश्न आपणच सोडवायचा हा ध्यास मनात धरुन ग्रामस्थांनी गेले अनेक दिवस भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली आहे.सुतार आळी ग्रामस्थांचे तळा तालुक्यात कौतुक होत आहे. तळा शहरातील सुतार आळी येथे चाळीस कुटुंबसाधारण एकशे पंचाहत्तर लोकसंख्या असलेल्या या वाडीतील ग्रामस्थांना तळा नगरपंचायतीतील पाणी पुरवठा योजनेमार्फत पाणी पुरवठा होत आहे.मात्र नगरपंचायतीकडुन पाणी एक/दोन दिवस आड, पाणी यायचे त्यामध्ये तांत्रिक बिघाडझाल्यास अधिक समस्या निर्माण होत असे त्यामुळे पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाडीला भेडसावत होती विशेष करुन महीलांना याचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत होता.अनेक वेळा याबाबतीत नगरपंचायतीकडे प्रश्न मांडले गेले परंतु पाण्याची समस्या जैसे थे होती याचा सारासार विचार करुन ग्रामस्थांनी या पाणी समस्येवर मात करावीच लागेल या हेतुने एकत्र येऊन स्वतः वर्गणी गोळा करुन वाडी शेजारील एका भागात ग्रामस्थांनी बोअरवेल खोदण्याचे ठरविले ग्रामस्थांचे दैव बलवत्तर म्हणुन त्या बोअरवेलला मुबलक पाणी लागले जीथे बोअरवेल मारली त्या ठिकाणाहून साठवण टाकीपर्यंत स्वदेशफाऊंडेशनने व स्वखर्चाने पाईप लाईन टाकुन ते पाणी घरोघरी नळ कनेक्शन देउन पाणी पुरवठा दररोज करण्यात येतो अशी माहीती प्रकाश यशवंत सुतार यांनी प्रतीनिधीना दिली वाडीसाठी स्वखर्चाने पाणी योजना राबविल्याने पाणी समस्या कायमची सुटली असुन महीला आनंदित आहेत.वाडीतील ग्रामस्थांनी आपल्याला भेडसावणारा पाणी प्रश्न आपणच सोडवुन ईतरांसमोर आदर्श ठेवला आहे.हे वास्तव समोर आले आहे."गाव करी ते राव काय करील" ही उक्तीप्रमाणे समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
Post a Comment