तळा(किशोरपितळे)
तळातालुक्यातकोरोना विषाणुच्या पाश्वभुमीवर अनेक दानशुर व्यक्तीमत्व आता पुढे येत असुन परम फुडस् आणि बेवरेज कंपनीचे मालक पांडुरंग महाडिक यांनी दिवसरात्र जनतेचे रक्षण करण्यासाठी उभे असलेल्या पोलीस बांधवांना त्याचप्रमाणे रोजच्या रोज तालुक्यातील नगरपंचायत ग्रामपंचायत यांचा दैनंदिनआढावा घेऊन उपाययोजना आखण्याचे काम करणाऱ्या तहसिल आणि पंचायत समिती कार्यालयास व विशेष करुन या महामारीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वच नागरिकांना तपासुन त्यांची सेवा करणारे डाॅक्टर्स, नर्स आणि कर्मचारी वर्गाला पाण्याच्या बाटलीचे वाटप केले.
त्याचप्रमाणे तळा तालुका भाजपा अध्यक्ष कैलास पायगुडे यांनी तळा शहरातील गरजवंतांना स्वखर्चाने तांदुळ, साखर, चहापावडर यांचे वाटप केले कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी कंबर कसली आहे सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत याच पाश्वभुमीवर तालुक्यातील दानशुर व्यक्तिमत्व आता स्वतःहुन पुढे येत असुन शासकीय अधिकारी यांचे मनोबल वाढविण्यासाठीत्यांनासहकार्यकरतआहेत.लाँकडाऊन च्या काळात जीवनावश्यक वस्तू गोरगरीब, हाताला कामाबरोबरच दाम नसल्याने सामाजिक बांधीलकी जपत अनेक संस्था, दानशूर व्यक्तीही गरजवंतांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तु पुरवुन त्यांची गरज भागवत आहेत.
Post a Comment