पद्मश्री डॉ.अनुराधाताई पौडवाल यांच्या वतीने यंत्रसामृग्रीसाठी जे.जे.रुग्णालयास देणगी.


तळा( किशोर पितळे)
 सर्वोदय फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा पद्मश्री डाॅ.अनुराधा पौडवाल यांच्या वतीने कोरोना विषाणु संक्रमण नियंत्रण व उपाययोजना करिता मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मा.मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन जे.जे.रुग्णालय (मुंबई) येथे कोरोनाग्रस्थ रुग्णावर तातडीचे उपचार करण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्रीखरेदीसाठी देणगी देण्यातआली यावेळी जे.जे. हॉस्पिटल अधिक्षक डॉ संजय सुरसे,डॉ दिलीप गवरी, मुख्य मेडिकल सोशल वर्कर श्री विभुते, नाना पालकर स्मृती समितीचे व्यवस्थापक श्री कृष्णा महाडिक उपस्थित होते.कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात आणि राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे विशेष करुन मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर तातडीने उपाय योजना करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणुन लागणारी यंत्र सामुग्री घेण्यासाठी पद्मश्री डॉ.अनुराधाताई पौडवाल संस्थापक अध्यक्ष सर्वोदय फौंडेशन यांच्या वतीने  देणगी देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा