बोर्ली पंचतन- अभय पाटील
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गावची ग्रामदेवता चिंचबादेवी देवस्थान समितीच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1 लाख रुपये मदतीचा धनादेश जमा करण्यात आला असल्याची माहिती चिंचबादेवी देवस्थान समितीची अध्यक्ष गणेश केशव पाटील यांनी पत्रकारांना दिली.
जगभरामध्ये कोरोना कोव्हिड 19 या विषाणूच्या रोगाच्या प्रादुर्भावाने हाहाकार मांडला असून कोरोना रुग्णां वर उपचारासाठी देशाला, राज्याला अनेक सेवाभावी संस्था, विविध संघटना, व्यक्तिगत, व्यवसायिक मदतीचा हात वेगवगळ्या रूपाने पुढे करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहना नुसार खारीचा वाटा म्हणून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गावची भक्तांचे श्रद्धास्थान असणारी सुप्रसिद्ध
ग्रामदेवता चिंचबादेवी देवस्थान समितीच्या वतीने ह्या वर्षी शिमगोत्सवाचे देवस्थानला मिळालेले 1 लाख रुपयांचे उत्पन्न महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून धनादेशाने जमा करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्याच्या उद्देशाने सदर मदत करण्यात आली असल्याची माहिती चिंचबादेवी देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली.
Post a Comment