म्हसळा वार्ताहर
खरसई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील विद्युत खांबाचा इन्सूलेटर सपोर्ट (clamp) तुटलेला असून त्यास तारेच्या साहाय्याने तात्पुरत्या स्वरूपात बांधले असून धोकादाक स्थिती निर्माण झाली आहे.शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम होत असतात पावसाळ्यात सोसाट्याच्या वारा व पाऊस यामुळे दुर्घटना घडून विद्यार्थ्यांच्या व नागरिकांची हानी होऊ नये यासाठी महावितरण कंपनीने तत्काळ इन्सूलेटर सपोर्ट पट्टी (clamp) बदलणे गरजेचे आहे.
त्याचप्रमाणे साळविंडे ताडाची वाडी येथे महावितरणचे विद्युत फ्यूज अगदी लहान मुलांचेही हात पोहोचतील एवढ्या उंचीवर आणि मोडक्या आधाराच्या साहाय्याने लावले आहेत.अनेक वेळा तक्रार करूनही वायरमन याकडे लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे
सध्या देशावर करोना सारख्या गंभीर महामारीचे प्रादुर्भाव असून सुध्दा महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःची काळजी घेत योग्य नियोजन करून तालुक्यातून येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पावसाळा पूर्वीच्या दुरुस्तीच्या कामांकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
Post a Comment