कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य सेतु ॲपचा वापर करावा - जिल्हाध्यक्ष मयुर कांबळे

नागरिकांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून देण्यासाठी रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटना सक्रिय

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

कोरोना व्हायरसच्या संकटाने अवघ्या विश्वाला हादरून सोडले असून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून कोरोनाला हरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी कडक पावले उचलली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ ॲप तयार केले आहे. यापूर्वी आपण अनेक प्रकारचे ॲप बघितले असतील, त्याचा वापरही केला असेल आता भारत सरकारने चक्क ‘कोरोना’ व्हायरसच्या संकटावर विजय मिळविण्यासाठी आणि नागरिकांना ‘कोरोना’ पासून सतर्कता बाळगण्यासाठी व धोक्याची माहिती अवगत करणारा ‘आरोग्य सेतु’ नावाचा ॲप लॉन्च केला आहे. नागरिकांनी आपल्या संरक्षणार्थ कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी शासनाच्या आरोग्य सेतु ॲपचा वापर करावा अशी माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्यसचिव तथा रायगड जिल्हा अध्यक्ष मयुर कांबळे यांनी दिली आहे.
    रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटनेने हे ॲप जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था, सेवाभावी संस्था मित्र मंडळ, गावातील तरुण, ग्रामपंचायत कार्यालय, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच प्रत्येक नागरिकाने डाऊनलोड करावे, असे आवाहन देखील केले आहे. 
    आरोग्य सेतू या मोबाईल अँपच्या माध्यमातून कोरोना विषाणूचे संक्रमण ओळखण्यासाठी मदत होणार असुन या अँपमध्ये कोरोना विषयीची लक्षणांची माहिती देण्यात आली आहे. मोबाईलमध्ये अँप इंस्टॉल केल्यावर ॲप्लिकेशन विविध माहितीचे संकलन करणे व आवश्यक त्या सूचनेचे प्रसारण करते. या अँपद्वारे कोरोना विषयीची जोखीम कितपत आहे. याबाबत माहिती मिळणे शक्य होणार आहे. ‘आरोग्य सेतू’ ॲप कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचे काम करेल. तसेच हे ॲप युजर्सच्या ब्लू टूथ, मोबाईल नंबर आणि लोकेशन वरून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात आला तर नाही ना? ती व्यक्ती कोरोना बाधित आहे की नाही ? या बाबी तपासून हे ॲप गुगल वर दिलेल्या लिंक वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोनाशी सुरू असलेल्या या युद्धात एकजुटीने सहभागी होऊन कोरोना विषाणूंचा संक्रमण रोखण्यासाठी लढा द्यावा. अँप डाऊनलोड करून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

 ■ आरोग्य सेतू अँपचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :-

◆ कोरोना पासून आपले संरक्षण कसे करता येईल याची माहिती आपल्या भाषेत देण्यात आली आहे.

◆ आपल्या Bluetooth आणि Location द्वारे कोविड - १९ पॉझिटिव्ह चाचणी घेऊ शकणाऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर सामाजिक आलेखाद्वारे आपला संवाद ट्रॅक करतो.

◆ आपण कोविड - १९ ची चाचणी घेतल्यास आपण नकळत, अगदी नकळत आपल्या जवळ आल्या असल्यास आपल्याला सतर्क केले जाईल.

◆ अँप अलर्ट द्वारे आपल्याला विलगिकरण (Quarantine) विषयी सूचना आणि लक्षणे उत्पन्न झाल्यास काय करावे याविषयी मदत आणि माहिती आहे.
  
कोरोना विषाणूबद्दल जनजागृतीसाठी आरोग्य सेतू  हे अँप केंद्रशासना कडून तयार करण्यात आले असून प्रत्येक नागरिकाने या अँपचा वापर करावा असे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भाषणातून सांगितले असून त्यालाच अनुसरून जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक आपल्या गावातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून हे अँप इन्स्टॉल करून देत असून तशी यादी देखील बनविण्यात आली आहे.देशावर आलेल्या संकटात आमचे संगणक परिचालक अँप इन्स्टॉल करण्यापासून कोरोना च्या लढाईत वरिष्ठांच्या सूचनेनुसार मिळेल ते काम करत असल्याने मला माझ्या संगणक परिचालकांचा अभिमान वाटतो.या अँप च्या मदतीने आपण स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या मित्रपरिवाराचे रक्षण करू शकता आणि कोविड - १९ सोबत लढण्याच्या प्रयत्नात आपल्या भारत देशासाठी मदत करू शकता.
- मयुर गणेश कांबळे
राज्यसचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा