लॉक डाऊनचे काला वधीत दुचाकी स्वाराचे कायद्याचे उल्लंघन ; म्हसळा पोलीसांची कठोर कारवाई .


लॉक डाऊनचे काला वधीत दुचाकी स्वाराचे कायद्याचे उल्लंघन म्हसळा पोलीसांची कठोर कारवाई .
म्हसळा पोलिसांचे होत आहे कौतुक.

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
संपूर्ण रायगड जिल्ह्यात संचारबंदीचे उल्लघन करून रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकाना रायगड पोलीसानी बडगा पुकारल्यामुळे म्हसळा पोलीसानी हा विषय गंभीर घेतल्याने वाहने जप्त करणे, वाहनचाकलांकडून दंड वसूल करणे, यावर पोलीसांनी भर दिला आहे. म्हसळ्यात सुद्धा पोलीसाना असे अनेक महाभाग भेटतात ,मात्र ही कारवाई करतांना मारझोड करण्या पेक्षा म्हसळा पोलीसांनी दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे. असाच प्रकार गुरुवार दि. १६ रोजी .नाकाबंदी करीत असताना पुढे आला, एक दुचाकी स्वार अत्यावश्यक सेवेचा स्टीकर लावलेली आपली दुचाकी कर्कश हॉर्न वाजवीत पुढे आला , त्याचा समज असा होता अत्याव- श्यक सेवेचा स्टीकर आसल्याने मला कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकारच आहे, कर्तव्यावर हजर आसलेल्या वाहतुक पोलिसाने मात्र आपले कर्तव्य बजावत संबंधीत दुचाकी स्वाराला इशाराकरून तात्काळ थांबवण्याचा प्रयत्न
केला, दुचाकीस्वार थांबल्यावर कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफीक पोलीसने वाहन चालका जवळ लाससन्स व अन्य कागद पत्राची मागणी केली असता अत्यावश्यक सेवेच्या स्टीकरला महत्व देत बसल्याने व अत्यावश्यक सेवेसह कोणतेही कागद पत्र न दाखविल्याने पोलीसांचा इशारा न मानणे, कर्कश हॉर्न वाजविणे लाससन्स व अन्य कागदपत्र न दाखविणे याअर्तगत मो.वा.कायद्याचे ऊल्लंघन केल्यामुळे रु१२oo दंड आकारला. या वेळी अन्य दुचाकी स्वारानी लायसन्स व अन्य कागद पत्र पटापट दाखवून पोलिसांची सहानुती मिळवली तर एका खाजगी डॉक्टरने सर हेल्मेट घालायला विसरला परत अशी चूक होणार नाही Sorry Sirम्हणत कडक पोलिसांचे नम्रतेने मन जिंकले.

"म्हसळा पोलीसानी वाहतुक नियमांचे कडक पालन करीत आपले कर्तव्य बजावत आहेत, दुचाकीस्वाराना नियमांचे पालन करण्याबाबत योग्य समज देत आहेत, हेही कर्तव्याचाच भाग आहे, कृपया कामाशिवाय नागरिकानी शहरांत वाहने घेऊन येऊ नये, पोलीसाना सहकार्य करावे"
जयश्री कापरे, नगराध्यक्षा नगरपंचायत म्हसळा.

"टाळेबंदीमुळे वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी दुचाकी, चार चाकी आणि तीन चाकी वाहनांच्या वापरावर प्रतिबंध घातला आहे. वाहन अत्यावश्यक सेवेत वापरात असेल तरी त्याचे संबधीत सर्व कागदपत्र वाहतुक पोलिसाना दाखविणे हे बंधनकारक आहे"
धनंजय पोरे, स.पो.नी, म्हसळा पोलीस स्टेशन

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा