संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
रायगडचे खासदार श्री सुनील तटकरे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा येथे न्यू इंग्लीश स्कूल मध्ये अधिकारी वर्गाची बैठक घेऊन आढावा घेतला.बैठकीत म्हसळा तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वर्वभूमीवर आढावा घेऊन अधिकारी वर्गाला सूचना केल्या उज्वला गॅस योजने मार्फत गॅस सिलेंडर तसेच धान्य वाटप सुरळीत व्हावे याबाबत सुचना देण्यात आल्या.कोरोनाचे रुग्ण मिळू नयेत अपेक्षा मात्र दुर्दैवाने कोणाला संक्रमण झालेच तर पनवेल येथे विलीगी करण कक्ष तयार आहेच त्याच बरोबर रुग्ण संख्या वाढल्यास माणगाव येथे सुद्धा विलगीकरण कक्ष तयार ठेवण्यात येईल असे सांगितले .तसेच कोरोनाला घाबरू नका काळजी घ्या घराताच थांबा सोशल डिस्टंस्टिंग पाळा असे जनतेला आवाहन केले .या बैठकीला श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी बी .एन.पवार, तहसीलदार ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश कांबळे,ग.वि.अ.वाय.एन.प्रभे,म्हसळा पोलीस ठाण्याचे, स.पो.नी.धनंजय पोरे, मुख्याधिकारी मनोज उर्कीडे ,तालुका अध्यक्ष समीर बनकर,आदी मान्यवर उपस्थित होते कोरोनाच्या बिकट परिस्थितीत गर्दी होऊ नये म्हणून खा.तटकरे यांच्या आढावा बैठकीची शासनामार्फत गोपनीयता राखण्यात आली हाेती.
Post a Comment