लॉकडाऊन कालावधीत अन्नधान्य पुरवठा किंवा स्वस्त धान्य दुकानांविषयी मदत किंवा मार्गदर्शनासाठी "यांच्याशी" संपर्क साधा


लॉकडाऊन कालावधीत अन्नधान्य पुरवठा किंवा स्वस्त धान्य दुकानांविषयी मदत किंवा मार्गदर्शनासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्र.जाहीर

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात   दि.14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.  मात्र आता लॉकडाऊनचा कालावधी दि.3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने यापुढेही दि.14 एप्रिल 2020 रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.03 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे.
लॉकडाऊन दरम्यान अन्नधान्य पुरवठा किंवा स्वस्त धान्य दुकानांविषयी मदत किंवा मार्गदर्शनासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी, मधुकर बोडके-9004711999, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02141-222087/222097, व सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, श्री.गोविंद वाकडे, मो.9762813831 यांच्याशी तर तालुकास्तरीय मदतीसाठी वा मार्गदर्शनासाठी संबंधित तहसिदारांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

1 Comments

  1. प्रत्येक माणसाला एका वेक्ती मागे 5kg तांदूळ पण एक कार्ड मध्ये समजा चार नावं असली तर जो सरकार काडून मोफत तांदूळ मिळतात 5kg प्रमाणे 20kg मिळायला पाहिजे पण ते मिळत नाही त्याची चवकशी करावी

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा