तळा तालुक्यात नऊ हजारांहून अधिक चाकरमानी पोहोचले


तळा तालुक्यात नऊ हजारांहून अधिक चाकरमानी पोहोचले ; अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असतानाही अधिकारी सतर्क. 

तळा (किशोर पितळे)

संपुर्ण देशात लाॅकडाऊन घोषीत झाल्यानंतर तळा तालुक्यात तब्बल नऊ हजारांहून अधिक चाकरमानी पोहोचले असल्याची माहीती समोर आली आहे.दरम्यान, मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरून अनेक पादचारी कोकणाकडे पायी चालत जाताना दिसून येत असुन तळा तालुका देखील याला अपवाद नसुन येणाऱ्याची संख्या दिवसेंं दिवस वाढत आहे.तळा तालुक्यातील महसूल विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी, पंचायत समितीचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी ग्रामीण भागात कोरोना संसर्ग टाळण्यापासून आवश्यक ती खबरदारी घेण्यासह नव्याने तळा तालुक्यातील गावोगावी येणाऱ्या चाकरमान्यांची नोंद केली जात आहे. तळा तहसिलदार मा.अण्णापा कनशेट्टी,गटविकास अधिकारी व्ही.व्ही.यादव पोलीस निरीक्षक गेंंगजे यांनी आपसांत समन्वय ठेऊन आरोग्य आणि पोलीस यंत्रणेशी संपर्कात राहुन कोरोना संदर्भातील कामकाज नेटाने सुरू ठेवले आहे.तळा तालुक्यात मुंबई पुणे येथुन आदी शहरांतून आपआपल्या गावी आल्याचे दिसून येत आहेत.
उपलब्ध आकडेवारीनुसार,
भानंग ग्रामपंचायत-५१५, 
तळेगाव ग्रामपंचायत-३८७ 
चरई खुर्द ग्रामपंचायत-४२३,
मालुक ग्रामपंचायत-३०३, 
रहाटाड ग्रामपंचायत-९९५, 
वांजळोशी ग्रामपंचायत-५५१
उसर खुर्द ग्रामपंचायत-३५५,
पन्हेळी-३८८,
मजगाव ग्रामपंचायत- ४८१,
गिरणेग्रामपंचायत-३१९,
काकडशेत ग्रामपंचायत४१४,
महागाव ग्रामपंचायत-३३७,
सोनसडे ग्रामपंचायत-३६२,
पढवणग्रामपंचायत-३१८,
निगुडशेत ग्रामपंचायत-१९२
बोरघर हवेली-१३२,
कर्नाळा फळशेत-३३९,
वाशी ग्रामपंचायत-१४६,
वरळ ग्रामपंचायत३४७,
मांदाड ग्रामपंचायत-४७५,
रोवळा ग्रामपंचायत-३९५,
पीटसई ग्रामपंचायत-२५०,
शेणवली ग्रामपंचायत-१३८,
मेढा ग्रामपंचायत-९२,
वानास्ते ग्रामपंचायत-२६० 
अशी ग्रामपंचायत निहाय आकडेवारी प्राप्त झाली असूनतळा-३५२, राणेचीवाडी- ८६, बामणघर-२६, अंबेली-२९, तारणे-५३, आनंदवाडी- १०३ अन्य गावांतील चाकरमान्यांची संख्या सरपंच, पोलीस पाटील,तलाठी आणि ग्रामसेवकांकडून मोजून नोंदली जात आहे. यामध्ये तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडे दोन किंवा तीनपेक्षा ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने याकामी यादी अद्ययावत होण्यास विलंब होत आहे.पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मते ही संख्या आज दि१४/४/२०२० रोजी ९८६१ हजारांहून अधिक असण्याची शक्यता आहे.तळा पंचायत समितीमार्फत याबाबत आढावा घेतला जाऊन वरिष्ठ पातळीवर सादर केला जात आहे. अजूनही या आकडेवारीमध्ये वाढ होत आहे. तळातालुक्यात आरोग्य विभागासह प्रत्येकखात्यामध्ये अधिकारी,कर्मचारी यांची वानवा असताना कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न प्रशासन स्तरावर होताना दिसत आहेत नागरीक देखील प्रशासनास सहकार्य करीत आहेत. तालुक्यात एकही कोरोना संक्रमित रुग्ण आढलेला नसुन येणाऱ्या मुंबईकरांची तपासणी सुरु आहे प्रत्येकाच्या हातावर होम काॅरंटाईनचे शिक्के मारण्यात येत आहेत.नव्याने आलेल्या मुंबईकरांना सतर्कता म्हणुन ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक शाळा,अंगणवाडी समाज मंदिरे येथे विलगीकरण करण्यात येत असल्याचे समजते. सध्या संपुर्ण देशासह राज्य लाॅकडाऊन असताना मुुंबईतुन तळातालुक्यापर्यंत हे पादचारी ववाहनचालक कसे पोहोचतात,त्यांनाआधी कुठेही तेथील प्रशासना कडून का अडविले जात नाही,असा सवाल या परिस्थितीत विचारला जात असून तालुक्यातील प्रशासनावर विनाकारण ताण वाढविण्याचा प्रकार होताना दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा