खैराच्या विनापरवानगीअवैद्य साठ्यावर वन खात्याची धडक कारवाई ; तेहतीस हजारांचा मुद्दे माल जप्त.



तळा (किशोर पितळे)
संपुर्ण देशात आणि राज्यात कोरोना महामारीमुळे संचारबंदी आणि लाॅकडाऊन सरु असताना त्याचा गैरफायदा घेऊन तळा तालुक्यात अवैद्य जंगलतोड करुन पर्यावरणाचे संतुलन बिघडवणाऱ्य लाकुड माफीयांना वनखात्याने चांगलाच दणका दिला आहे.तालुक्यातील चरई बौध्दवाडी येथे खैर या लाकडाची अवैद्य तोड करुन जंगलात माल लपवुन ठेवणारया लाकुड माफीयांना तळा वन खात्याने जोरदार दणका देत तेत्तीस हजारांचा माल हस्तगत केला आहे.    
तळा वनपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार दि१४ एप्रिल रोजी वन खात्यास  गुप्त बातमी मिळाली या गुप्त हेरगिरी कडून बातमीच्या अनुषंगाने सकाळी आठ वाजता वनरक्षक वनमजुर आणि स्टाफ यांच्या समवेत चरई येथील काही भागाची फिरती पाहणी केली असता चरई बौध्दवाडीच्या उत्तरेला मुख्य डांबरी रस्त्यापासुन शेतीकडे जाणारया कच्च्या मातीच्या मार्गावर२००मीटरच्या अंतरावर झाडी झुडपात लपवुन ठेवलेला सोलिव खैर किटा ५.७०० घ.मी.माल सापडलाबाजारभावा प्रमाणे किमान तेहतीसहजारांचा अनधिकृत माल सापडला सदरच्या मालाबाबत तोड करण्यासाठी अज्ञाताने कोणत्याही प्रकारची परवानगी वन खात्याकडून घेतलेली नाही त्यामुळे सदरचा माल जप्त करुन त्या माला वर तळा वनपाल यांचा शिक्का मारुन वाहनाच्या सहाय्याने माणगाव येथील नाणोरे डेपो येथे जमा करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा