म्हसळा बाजारपेठ उद्यापासून पूर्णपणे लॉक डाऊन : आत्यावश्यक सेवा घरपोच देण्याचे प्रशासनाचे आदेश : जनतेत नाराजी
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
कोरोनाचे गांभीर्य वाढत असताना व जिल्ह्यात कोरोना+ रुग्णांची संख्या ३८ झाली असून त्यामध्ये ५ रुग्ण श्रीवर्धन तालुक्यातील असूनही म्हसळा बाजारपेठेत आज प्रचंड ग्राहक वाढल्याने प्रशासनापुढे समस्या निर्माण झाली. महसुल,पोलीस, नगरपंचायत प्रशासन व आत्यावश्यक सेवा मधील किराणा व भुसार विक्रेत्यानी उद्या दि.२२एप्रिल ते ३ मे बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, यामध्ये ग्राहकानी आपल्या मागणी नुसार संबधीत किराणा व्यापाऱ्याला Whatshop वर मालाची ऑर्डर देयची व संबधीत व्यापाऱ्या ने ग्राहकाला माल पोहच करण्याचे सांगण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत त्याचे नियोजन करण्यात आले नाही.
प्रथम तहसीलदार शरद गोसावी यांच्या दालनात, पो.स्टेशनचे प्रभारी सपोनी धनंजय पोरे, गट विकास आधिकारी वाय.एन. प्रभे, नगरपंचायतीचे Ceo मनोज ऊर्कीडे यांची बाजारपेठेतील गर्दी व उपाययोजना या बाबत चर्चा झाली व नंतर नगराध्यक्ष व्यापारी असोसीएशनचे अध्यक्ष नंदूशेठ सावंत, युनूस मेमन, जब्बरा शेट,खंगार शेट,नजीर मेमन,मनोहरशेठ यांची बैठक घेऊन कोरोनाचे गांभीर्य, ग्राहक घरीच राहीला तर सुरक्षित राहील यासाठी म्हसळा बाजारपेठ उद्यापासून पूर्णपणे लॉक डाऊन कराचा निर्णय घेतला.
बाजारपेठ बंद बाबत शहरांत होत आहेत उलट- सुलट चर्चा.
"म्हसळयात प्रशासनात सुसूत्रता समन्वय नसल्याचा आभाव आहे, तालुक्यातील सुमारे११०गाव- खेडयाची मुख्य बाजारपेठ असलेल्या ग्राहकांची बाजारपेठ अचानक बंद करून प्रशासन नक्की काय साधणार आहे,"
" मुस्लीम धर्मीयांचा पवित्र रमजान मासारंभ शनीवार दिनांक २५ एप्रिल पासून सुरु होत असताना व राज्यात लॉक डाऊनची शिथीलता होत असताना रमजानच्या पूर्वससंधेला आत्यावश्यक सेवेचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय योग्य नाही तालुक्या तील ग्राहकाना किमान २४ तास अगोदर पूर्व सूचना देणे आवश्यक आहे"
" म्हसळा नगरपंचायत घेत असलेल्या निर्णयाची योग्य प्रमाणे अनाऊंसीग गाडीने चौका- चौकात थांबवून अनाऊंसीग केले जात नाही"
" सोशल डीस्टंस पाळला जात नाही म्हणून कोणताही अवधी न देता आत्यावश्यक सेवा बंद करण्याचा प्रशासनाने घेतलेला निर्णय हा अत्यंत घाई गर्दीचा आहे, तालुक्यातील गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा दर्जेदार मिळाव्यात, ५०% रिक्त पदे भरण्याबाबत मागणी करावी, बाजारपेठेंत आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी व जनतेची मान्सूनपूर्व कामे पूर्ण होण्यासाठी, नगरपंचायतीसह तालुक्यातील ६० % गावांत भेडसवणारी पाणी टचाईवर सक्षम मात करण्यासाठी प्रशासनाने वेळ देणे महत्वाचे आहे."
महादेव पाटील , तालुका प्रमुख शिवसेना.
Post a Comment