म्हसळा -वार्ताहर
कोरोना प्रादुर्भावचे काळात देशात लहानमोठे उद्योग व्यवसाय आणि रोजंदारी ढप्प झाली असल्याने गरीब गरजु निराधार कुटुंबातील घटकाला जीवनावश्यक वस्तूंची मदत व्हावी यासाठी सर्वत्र शासना बरोबरच अनेक सेवा भावी संस्था,राजकीय मंडळी वेगवेगळ्या प्रकारची मदत करताना दिसत आहेत.अशाच पद्धतीने म्हसळा तालुक्यातील मांदाटने प्राथमिक शाळा मुख्याध्यापक नरेश सावंत यांचे विशेष प्रयत्नाने मुंबईतील सामाजिक सेवा भावी संस्था आई फाउंडेशन मार्फत तोंडसुरे आणि मांदाटने गावातील सर्वच निराधार महिलांना धान्य वाटप करून मदतीसाठी एक हात पुढे केला आहे.सोशल डिस्टस्टींगचा काटेकोरपणे पालन करत धान्य वाटप कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे,समाजसेवक समीर बनकर,म्हसळा तहसिलदार शरद गोसावी,गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,संस्था प्रमुख राजुशेट साळुंखे,तोंडसुरे सरपंच श्रीमती जंगम,अध्यक्ष गोपाळ भायदे,माजी सरपंच मनोज नाक्ती,उपसरपंच उमेश नाक्ती,माजी पोलीस पाटील भरत नाक्ती,बौध्द समाज अध्यक्ष स.भी.पवार गुरुजी,मांदाटणे सरपंच चंद्रकांत पवार, श्रीमती पवार आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्याध्यापक नरेश सावंत यांनी योग्य वेळी आई फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजूशेठ साळुंखे यांना संपर्क करून म्हसळा तालुक्यातील वरील गावांतील निराधार कुटुंबातील व्यक्तींना मदतीसाठी आवाहन केले.आई फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावातील निराधार महिलांना धान्य मदत मिळाली त्याचे मांदाटणे सरपंच चंद्रकांत पवार,तोंडसुरे सरपंच श्रीमती जंगम यांनी कार्यक्रम आयोजक व वितरकांना मनोमन धन्यवाद दिले.
Post a Comment