कोरोना सारख्या जीवघेण्या विषाणुने आज पुर्ण जगात थैमान घातला आहे. त्याच बरोबर आपल्या भारत देशात देखील या विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे.यामुळे संपुर्ण देश लाँकडाउन करण्यात आला आहे.परंतु यामुळे ग्रामीण भागातील रोज कष्ट करून रोजंदारी वर असणारांचे खुपच हाल होत आहेत. अशा प्रकारच्या अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
हेच लक्षात घेऊन हेल्प ग्रुप फाउंडेशन ने बोर्लीपंचतन, वडवली, कुडकी, वेळास, आदगाव, सर्वे, कुडगाव अशा सात गावांमधील ३० गरजु कुटूंबांना जीवनावश्यक वस्तुंचा वाटप केला त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला ५ किलो तांदूळ,२ किलो कांदे,२ किलो बटाटे,१ किलो साखर,पाव किलो चहा पावडर,गोडतेल १ लिटर, १ किलो हरभरा, १ किलो चवळी,१ किलो मुगडाळ आदी वस्तुंचे वाटप करण्यात आले.
आमचं कार्य बघुन इतरांच्या मनातही असे कार्य करणयाची इच्छा जाग्रुत होईल व आणखी गरजु लोकांना त्यामुळे लाभ होईल असे मला वाटते.
-श्री.धवल तवसाळकर (अध्यक्ष,हेल्प ग्रुप फाउंडेशन)
Post a Comment