कोरोना आजाराची जनजागृती करण्यात आशा (स्वंयसेविका)अंगणवाडी सेविकांंचा महत्वाची भूमिका : मोहबदला मिळणार असल्याने समाधान.
तळा (किशोर पितळे)
चीन मधून कोरोना विषाणूजन्य संसर्ग आजाराची आपल्या देशात लागण होऊ शकते या पार्श्वभूमीवर महिला बालकल्याण विभागातून आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध भागात जनजागृती मोहीम घरोघर जावून करण्यात आली होती. यामध्ये दिर्धकाळ खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, स्वच्छ हात धुणे, वारंवार ताप येणे तापात चढ उतार होत असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देत असताना तसेच ससंर्ग होऊ नये म्हणून खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करणे स्वतः बरोबर इतरांची काळजी घ्या. अशा प्रकारची जनजागृती केली जात होती बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका किर्ती भाटकर यशवंती राऊत मँडम आपले कर्तव्य बजावत होते आणी काही दिवसातच कोरोना संपूर्ण देशात या जीवघेण्या आजारांनी हात पाय पसरण्यास सुरुवात केली ही साथ रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलत संपूर्ण देश लाँक डाऊन केला व संचारबंदी आदेश देण्यात आले. या काळात आशा सेविका ठराविक मानधनावर प्रशासनास मदत करण्यात कमी पडताना दिसत नाही मानधन वेळेवरनाही, कामाला आधी पण उल्लेख कुठेच नसतो, कोरोना साथ सुरूझालीत्या दिवसापासून घरोघरी फिरून सर्व्हे करतात, कोणी बाहेरून, परदेश/पुणे, मुंबई मधून असले काय, कोणी आजारी आहे का, सगळी माहिती नमुन्यात भरून आरोग्य केंद्रात देतात, ANM, MPW तर प्राथमिक आरोग्य केंद्रात, व उप केंद्रात सेवेत आहेत, मग दररोज आपल्या पर्यंत येते आकडेवारी, किती लोक परदेशातून, परराज्य, परगावातून आले, किती आजारी, यापैकी किती refer केले, याचा database प्रत्येक गावातून तालूक्यातुन प्रशासना पर्यंत संपूर्ण देशामध्ये कळविण्यात येते लोककल्याणाच्या कोणत्याही कामाचे जनजागरण करण्या कामी तळा महिला बालकल्याण विभाग नेहमीच सिंहाचा वाटा ऊचलीत असल्याचे दिसुन येते.या महीला आशा (वर्कर्स) संलग्न अंगणवाडी सेविका/ मदतनीसाचा महत्त्वाचा दुवा समजण्यात येते आशा सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा खारीचा वाटा असल्याने ग्रामविकासमंत्री मा.हसन मुश्रीफ यांनी कामाची दखल घेऊन प्रोत्साहनपर मोहबदला दिला जाणार आहे असे आश्वासन दिले असल्याने समाधान व्यक्त केले आहे.
Post a Comment