म्हसळा - वार्ताहर
रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती अलिबाग मार्फत पुरवठा करण्यात आलेल्या हायपोथॅर्मियां किटचे बाळ विकास प्रकल्प कार्यालय म्हसळा मार्फत आदिवासीवाडी येथील अंगणवाडीमधील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.वाटप कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,गट विकास अधिकारी वाय.एम.प्रभे,सहाय्य बीडीओ डोलारे,सीडीपीओ तरवडे,वैद्यकीय अधिकारी सागर काटे,विस्तार अधिकारी गायकवाड,अंगणवाडी सेविका सानिका कांबळे आणि लाभार्थी उपस्थित होते.वाटप केलेल्या हायपोथर्मिया किटमध्ये बाळासाठी गादीलोडसह स्वेटर,टोपी,पायमोजे,हातमोजे,दोन रुमाल,झबले टोपरे 6 नग,झोपन्यासाठी मुलायम चटई,बेबीपॅड 5 नग,हिमालया मॉलिश तेल, बेबी पावडर 2 नग,संतूर हॅन्ड वॉश,हिमालया साबण 4 नग,प्लास्टिक 2 नग,मुलांचे संगोपनासाठी कॉटन रुमाल 2 नग अशा दर्जेदार साहित्याचा समावेश आहे.साहित्य वाटप करताना गविअ प्रभे,सीडीपीओ तरवडे,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या साहित्याचा लाभार्थ्यांनी आपल्या बाळाचे संगोपना साठी,त्यांचे सुरक्षित आरोग्यासाठी आणि निरोगी राहण्याची काळजी घ्यावी ह्या उद्देशाने मोफत उपलब्ध करुन दिले आहेत.बाळ विकास प्रकल्प कार्यालय,पंचायत समिती आणि अंगणवाडीचे मार्फत म्हसळा आदिवासीवाडी येथील गरीब व गरजू लाभार्थी यांना हा लाभ योग्य वेळी देण्यात आल्याने सर्वांना धन्यवाद दिले.किट वाटप कार्यक्रमात लाभार्थी आनंदी दिसून आल्याचे सीडीपीओ तरवडे यांनी माहिती देताना सांगितले.
Post a Comment