श्रीवर्धन मधील २७ लोकांची कोरोना चाचणी ; श्रीवर्धन शहर, भोस्ते व लगत चा परिसर बंदिस्त


श्रीवर्धन मध्ये बाहेरून आलेल्या लोकांची संख्या वाढल्याची शक्यता 

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

श्रीवर्धन शहराच्या लगत असलेल्या भोस्ते गावात वरळी येथून आलेला व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्याशी संबंधित व संपर्कात आलेल्या २७ लोकांना तालुका प्रशासनाने कोरोना चाचणीसाठी पनवेल ला पाठवले आहे .काल भोस्ते गावातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या नंतर संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते .वरळी ते मोर्बा मार्गे म्हसळा सकलप  अंतर या व्यक्तीने ने पुर्ण केले त्या नंतर  म्हसळा शहराच्या जवळ असलेल्या सकलप  येथून टेंम्पो ने  नंतर श्रीवर्धन असे मार्गक्रमण  करत संबधित व्यक्ती   दिनांक ०५ एप्रिल ला सकाळी ०४:३० च्या  आसपास श्रीवर्धन मधील भोस्ते या ठिकाणी   दाखल झाली .वास्तविक बघता सदरच्या व्यक्तीला वरळी येथील राहत्या घरी असतांना कोरोना ची लागण झाल्याची शकता नाकारता येत नाही .मात्र त्याची लक्षणे उशिरा दिसून आल्याचे समजते .संबधित व्यक्ती श्रीवर्धन मध्ये दाखल झाल्या नंतर त्यास व त्याच्या परिवारातील इतर घटकांना होम क्वारनटाइन केले होते. .संबधित व्यक्तीने जसवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यानंतर संजविनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. यावेळी सदर हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी  दुचाकी, रिक्षा यांचा वापर केला. तसेच खाजगी लॅब  मध्ये जाऊन
स्वतःच्या हिवताप , डेंग्यू व मलेरिया यांची चाचणी करून घेतली .सदर चाचणी अहवालात तीन ही बाबी निगेटिव्ह आल्या नंतर अस्वस्थ वाटल्याने श्रीवर्धन मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू केले.  त्यानंतर पनवेल मधील रुग्णालयात स्थलांतरित केले आहे .

श्रीवर्धन तालुका प्रशासनाने संबधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २७  व्यक्तींना कोरोना चाचणी साठी पनवेल वर्ग केल्या नंतर तात्काळ भोस्ते , जसवली व श्रीवर्धन शहर बंदिस्त केले आहे .

श्रीवर्धन तालुक्यात लॉक डाऊन नंतर अंदाजे ८ हजारच्या जवळपास लोक आल्याची शक्यता आहे .त्या मुळे तालुका प्रशासना समोर असंख्य अडचणी निर्माण होत असून ग्रामीण भागात आलेल्या सर्व लोकांवर नियमित देखरेख ठेवणे शक्य नाही .तालुक्यात लहान मोठी ७८ गावे असून ७५हजारच्या जवळ पास लोकसंख्या  आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा