पनवेल महापालिका हद्दीतील कामानिमित्त्त मुंबईला जाणाऱ्यांचे प्रवास थांबवावेत. - नगरसेविका ऍड. वृषाली वाघमारे




पनवेल / प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिक मुंबई येथे कामानिमित्त जाणार्‍या लोकांचे प्रवास थांबविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वृषाली जितेंद्र वाघमारे यांनी पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांना पत्राद्वारे केली आहे. नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील आढळलेली कोविड 19च्या रुग्णांपैकी 90% रुग्ण हे मुंबई येथे कामास्तव, सरकारी किंवा निमसरकारी या क्षेत्रात काम करताना आढळून आलेले आहेत. मुंबई व इतर शहरामध्ये कोरोना रुग्ण यांचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. व त्यांचा परिणाम आपल्या पनवेल शहरालाही होऊ शकतो. म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक मुंबई किंवा इतर शहरांमध्ये जाणार्‍या लोकांचा प्रवास थांबविणे महत्वाचे आहे. त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात तसेच, काही दिवसांसाठी पनवेल महानगरपालिकेची हद्द बंद करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका ऍड. वृषाली वाघमारे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा