तळा (किशोर पितळे)
कोरोना संसर्ग विषाणूजन्य रोगाचे संक्रमण रोखण्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील हे प्रशासन आणि नागरिक यामधील महत्त्वाचा दुवा असून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार आहेत गेले महिनाभर अहोरात्र जीवावर उदार होऊन वैयक्तीक सुरक्षा नसताना काम करीत असून शासनाने पाच लाखाचे विमा संरक्षणाचे सुरक्षा कवच मिळावे अशी मागणी तालुका संघटक सचिन कदम यांनी केलीआहे. महसूल विभाग, पोलीस प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या
आदेशानुसार पोलीस पाटील प्रत्येक गावा गावात येणाऱ्या मुबंईतुन राज्यातून, परराज्यातून किंवा अन्य जिल्हातून आलेल्या नागरिकांची नोंद ठेवणे,ती तलाठी मार्फत प्रशासनास पुरवली जाते.अनोळखी व्यक्ती वर नजर ठेवणे, होमकाँरन्टाईन,काँरन्टाईन करणे चौदा दिवसांनी कोरोनाची टेस्ट होत असून त्यानंतर देखील पहाणी करीत असतात.हे कार्य करीत असताना कोरोना रोखण्यासाठी जनजागृती करण्यात देखील कमी नाही हे करीत असतानाच जीवावर उदार होऊन अहोरात्र प्रशासनाला सहकार्य करीत आहेत.अशा परिस्थितीत हँन्डग्लोज मास्क, सँ नीटायझर शासनाकडून पुरवलेले नाहीत त्यामुळे सहाजीकचआरोग्य धोक्यात येऊ शकते हि वेळ सहकार्य करण्याचीअसून शासनाने सर्व पोलीस पाटलांचा किमान पाच लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळावा अशी आमची रास्त मागणी करीत आहोत.याबाबतजिल्हाधिकारीयांच्या कडे केली आहे.
Post a Comment