संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
"कोव्हीड 19’ या घातक संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊनचा कालावधी 03 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत सर्वांनी घरातच थांबणे अत्यावश्यक आहे.मात्र जीवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी नागरिक बाजारात गर्दी करताना दिसत आहेत. ही गर्दी कमी करण्याकरिता महसुल, पोलीस ,म्हसळा नगरपंचायत व व्यापारी असोसिएशनच्या वतीने दि.२२एप्रिल ते ३ मे या कालावधीत बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो आज यशस्वी झाला,यामध्ये ग्राहकानी आपल्या मागणी नुसार संबधीत किराणा व्यापाऱ्याला Whatshop वर मालाची ऑर्डर देयची व संबधीत व्यापाऱ्याने ग्राहकाला माल पोहच करण्याचे सांगण्यात आले. घाई गर्दीने घेतलेल्या निर्णयामध्ये दूधाबाबत च्या विक्रीचा निर्णय योग्य झाला नसल्याने आज सकाळ पासून बाजारांत दूधाची बोंब झाल्याने प्रशासनाने आज गुरवार दि. २३ पासून बाजारात सकाळी ७ते ९ या कालावधीत दूध विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हसळा शहरात दूध विक्रीचे स्वतंत्र दुकान नसल्याने ब बहुतांश दूध विक्री केंद्र दूधा सोबत अन्य वस्तूंची विक्री करत आसल्याने सोशल डीस्टंस च्या महत्वाच्या नियमाना हरताळ फासला जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.नगरपंचायत प्रशासनाने निर्णय घेताना बाजारपेठ-ग्राहक व अत्यावश्यक सेवा याचा आभ्यास सर्व दृष्टीकोनातून योग्य केला नसल्याने हा गोंधळ होत आसल्याची बाजारांत चर्चा आहे. तर किराणा माल व्यापाऱ्यानी नगरपंचायत हद्दीत पोहोच देयचा या बाबत सुध्दा स्पष्टता अगर नगरपंचायतीने पत्रक काढले नसल्याने ग्राहक व विक्रेता या दोघांमध्येही गैरसमज होत आहेत.
"दिं.२२ एप्रिल पासून म्हसळा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, आम्ही ३ते४ दुकानातून शटर वाजवून किराणा माल मागीतला असता whatshop वर ऑर्डर द्या असे आम्ही ६-७ कि.मी. पाई आल्यावर सांगण्यात आले त्यापेक्षा योग्य प्रसीध्दी देऊन प्रशासनाने निर्णय घेतला असता तर बरे झाले असते ."
Post a Comment