वावे धरणाच्या पाण्यावर ओलीता खालीअसूनही शेती ओसाड ; पाठबंधारे विभागाचे दुर्लक्ष..?


वावे धरणाच्या पाण्यावर ओलीता खालीअसूनही  शेती ओसाड. पाठबंधारे विभागाचे दुर्लक्ष. बळीराजाने फिरवली पाठ.

तळा (किशोर पितळे)
तळा तालुक्यातील वावेधरण महाराष्ट्र शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाचे अखत्यारीत येत असुन याधरणाच्या पाण्यावर जवळपास अंदाजे सत्तावीस ते अठ्ठावीस हेक्टरक्षेत्र जमीन ओलीता खाली आहे. या पाण्याचा वापर वावे, बामणघर, खैराट, राणेची वाडी, (संगम)अंबेळी अशा गावांना होतो उन्हाळी भात शेतीचे क्षेत्र जवळपास निम्मेअसुन या जमीनीतमोठ्या प्रमाणावर भाताचे उत्पन्न होते.यंदा मात्र बळीराजा ने वाढती महागाई,मजूरांची कमतरता,मजूरीचादरवाढला असल्याने व कालवा दुरूस्ती न केल्यानेबहुतेकजमीन ओसाड टाकलीआहे.घरणाचे पाणी व नदी लगत असणाऱ्या शेतकऱ्यांनीभात पिका ऐवजी भाजीपाला, कार्ली,मिरची,भेंडी अशी पिके घेतली आहेत उत्पन्न अतिशय चांगले आले परंतु यंदा संपूर्ण शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना पुन्हा आपले नशीब अजमावून पहाण्याचा काही शेतकऱ्यानी भाजी पिकवून प्रयत्न केला.उत्पन्न आले पण पुन्हा नशीबाने शेवटी कोरोना रोगाचे संकट  पदरात घातले.देशात लाँकडाऊनमुळे बाजारात विक्री साठी घेऊन जाताआले नाही.व स्थानिक बाजारात भाजी विक्री करता न आल्याने व होलसेल व्यापारी नसल्याने सर्व भाजी सडून गेली त्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.यावर्षी झालेल्या अतीवृष्टीने भातशेती चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्याची भरपाई उन्हाळी भात शेतीतून निघेल पण पाणी असूनही वापर करता येत नाही.अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

"तळा तालुक्यातील वावे धरणाच्या पाण्यावर शेतकरी खरीपाची भातशेती करीत होता.पंरतु लघु पाटबंधारे विभागाने गेल्या तीन, चार वर्षात कालव्याची दुरुस्ती केलीनसल्याने पाणी मिळत नाहीआणीनदी शेजारीलशेतकरी भाजी पाला काढीत आहेत.कालव्याच्या दुरुस्ती साठी लेखी अर्ज करून ही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी भातशेती कडे पाठ फिरवली आहे."-भास्कर गोळे, जिल्हा उपाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघ.रायगड 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा