सध्या कोरोना (कोविड-19) विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरीता घोषित केलेल्या संचार बंदी काळात बिअर शॉप, वाईन शॉप परमिट रुम इत्यादींना सर्व प्रकारचे दारु विक्रीवर शासनाने निर्बंध घातले असताना खालील पोलीस ठाणे हद्दीत सदर नियमांचे उल्लंघन केले बाबत गुन्हे दाखल आहेत.
1) मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 11/04/2020 रोजी 19.40 वा. सुमारास आरोपी रा.सासवने ता.अलिबाग याने मौजे सासवणे येथे एकुण 4988 रूपये किंमतीची विदेशी दारू गैर कायदा विनापरवाना विक्री करीता बाळगले स्थितीत मिळुन आला. सदर गुन्ह्यातील आरोपीस दिनांक 12/04/2020 रोजी 00.15 वा. सुमारास अटक करण्यात आली आहे..
याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे गुरनं 26/2020 दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 b, c प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोना/891 घरत हे करीत आहेत.
2) म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 11/04/2020 रोजी 17.45 वा. सुमारास 02 आरोपी रा.बेलदारवाडी ता.म्हसळा यांनी राज्यात सर्व कारोना विषाणु संसर्गाचा प्रसार होत असल्याचे पार्श्व भूमीवर मा.जिल्हाधीकारी सो.रायगड अलिबाग यांनी संचारबंदीचे आदेश दिलेले असताना तसेच जिल्हयात दारूविकी पुर्णपणे बंदी असताना माहित असुनही हयगयीचे कृत्य करून शासनाने वेळोवेळी आदेश दिले असताना आरोपी यांनी मौजे बेलदारवाडी येथे एकूण 2500/- रुपये किमतीचे गावठी दारू विनापरवाना आपले ताबे कब्जात बाळगले स्थितीत मिळून आला.
याबाबत म्हसळा पोलीस ठाणे येथे गुरनं 12/2020 दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65d,e,f भा.द.वि.सं कलम 26927018834 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 चे कलम 51 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोना/1303 जाधव हे करीत आहेत, तरी रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, शासनाने सद्यस्थितीत निर्गमित केलेले नियम पाळावेत तसेच या नियमांची कोणी पायमल्ली करीत असेल तर सबंधित पोलीस ठाणे अगर नियंत्रण कक्षास तात्काळ कळवावे असे आवाहन रायगड पोलिस दलामार्फत करण्यात आले आहे.
Post a Comment