ग्रामीण भागात इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे शिघ्र पथक कार्यान्वित ; तालुक्यांतील ३९ ग्रामपंचायतीतील १० हजार ३६९ घरांतून सर्वेक्षण पूर्ण.



संजय खांबेटे :  म्हसळा प्रतिनिधी 
म्हसळा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायती मधील१० हजार ३६९ घरांतून विविध निकषाने सर्वेक्षण पूर्ण झाले आसल्याची माहीती पं.स.गट विकास अधिकारी तथा नोडल अधिकारी वाय.एन. प्रभे यानी दिली.सुमारे ५०२३५ लोकसंख्या असणा- ऱ्या तालुक्यातील आंबेत, रोहिणी,आडी महाड खाडी, भेकरेचा कोंड, खारगाव (बु.)पाभरे, निगडी, कांदळवाडा,खरसई,मेंदडी, रेवली,वरवटणे, गोंडघर, खारगाव (खुर्द), कणघर,लेप,कोळे, नेवरूळ,जांभूळ,घूम,साळविंडे,मांदाटणे, ठाकरोली,कोळवट, केलटे,तोंडसुरे,घोणसे,खामगाव, कुडगाव,संदेरी, लीपणीवावे, चिखलप,तोराडी,पांगळोली,वारळ,फळसप,तुरुंबाडी,काळसुरी, देवघर या ग्रामपंचायतीतील वाडी वस्तीवर जाऊन आशा वर्कर अंगणवाडी सेविका,मदतनीस तलाठी, ग्रामसेवक शिक्षक यांचे माध्यमांतून १० मार्च२०२०नंतर परदेशांतून प्रवास करून गावात आलेल्यांची माहीती, ते कोणकोणत्या देशांतून आले, मूळ रहीवासी, घरामध्ये अलगीकरण (Home Quarantine)
असा शिक्का आहे का?, ६० वर्षावरील आलेले परदेशी नागरिक, अलगीकरण केलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी होते का?घरांतील व्यक्तीना कोरोना ची लक्षणे, आसल्यास वैद्यकिय तपासणी झाली किंवा कसे शहरांतून अगर बाहेर गावावरून गावामध्ये येणाऱ्यांची नोंद,अशा विविध स्तरावरून नोंदी घेऊन ग्रामपंचायत स्तरावरील नोंदी तालुका स्तरावरील नोडल ऑफीसर व ती जिल्हास्तरावर पाठविण्यात आली आहे.३९ ग्रामपंचायतीतील ७९ गाव वाडीतील नोंदी पूर्ण झाल्या आहेत .आजपर्यंतच्या माहीती नुसार ९४७१ नागरीक मुंबई, पुणे व अन्य ठिकाणाहून आपल्या मूळ गावी आले आहेत. यांच्या नोंदी परीपूर्ण झाल्या आसल्याची माहीती गट विकास अधिकारी तथा नोडल अधिकारी वाय.एन. प्रभे यानी सांगितले.


"ग्रामपंचायत पातळीवरील सर्वेक्षणात आशा वर्कर ५५, अंगणवाडी सेविका ११०, मदतनीस ८६, मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक १८४, ग्रामसेवक १७, तलाठी १० व सरपंच, पोलीस पाटील यांचे मदतीने प्रत्येक ग्रामपंचयतीचे हद्दीतील घरांतील नागरीकांचे सर्वेक्षण केले"
-वाय.एन. प्रभे, गट विकास अधिकारी तथा नोडल अधिकारी


"कोरोनाशी खेळ करू नका,कारण कोण अनोळखी कोठून आलाय ? तो कोरोना पॉझिटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे? आपल्याला कळणारच नाही,तो पर्यंत खूप उशीर झालेला असेल,वेळीच सावध व्हा,आपल्या कुटुंबाला गावाला,तालुक्या- ला जिल्ह्याला वाचवा शासनाच्या नियमाचे आणि संचारबंदीचे नियम पाळा. तालुक्यात घरामध्ये अलगीकरण (Home Quarantine) कलेल्या नागरिकांची मुदत संपत येत आहे,घरातून बाहेर पडू नका,घरातच रहा सुरक्षित रहा"
डॉ. गणेश कांबळे तालुका आरोग्य अधिकारी,म्हसळा.




Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा