लॉकडाऊन कालावधीमध्ये नियमांचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

अलिबाग- संपूर्ण देशासह राज्यात करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावास रोखण्यासाठी सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे मुंबई,पुणे व परगावातील मंडळी रायगड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी पायी प्रवास करून परत येत आहे. अशा लोकांची गावी परतल्यानंतर प्रशासनाकडून आवश्यक वैद्यकीय तपासणी करून १४ दिवसांकरिता होम क्वारंटाईन करण्यात येते. त्यांच्यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळा, सामाजिक सभागृह यासारख्या शासकीय इमारतीच्या ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येतो. अशा क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची नियमित वैद्यकीय चाचणी तसेच त्यांना लागणाऱ्या अत्यावश्यक सुविधा तेथील स्थानिक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, परिचारिका मदतनीस यांच्यामार्फत शासन देत आहे.
     परंतू होम क्वारंटाईन केलेले नागरीक लाॅकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करून बेजबाबदारपणे घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांना सक्तीच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये पाठवावे, त्याचबराेबर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005तसेच  कलम १४४ अन्वये देखील कडक कारवाई करण्यात यावी, नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता घरातच राहावे, शासन या घटनेबाबत गंभीर दखल घेत असून  नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्याने ना.कु.आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांना दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा