श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
मानवी कार्य कर्तृत्वाने जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना हरवण्यासाठी कंबर कसली आहे .डॉक्टर , नगरपालिका , प्रशासकीय कर्मचारी व अंगणवाडी सेविका सर्वत्र कार्यरत असलेल्या निदर्शनांस येत आहेत .आरोग्य कर्मचाऱ्यांना मदतनीस व आरोग्य विषयक जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविका काम करताना दिसत आहेत .वय वर्ष सहा च्या आतील निरागस बालकांना मातृत्व रुपी सेवा देणाऱ्या सेविकांनी कोरोना सोबतच्या युद्धात पराक्रमाची पराकाष्टा केल्याची घटना समोर आली आहे .पोटात नऊ महिन्याचे बाळ घेऊन सौ नंदिनी अक्षय दिवेकर या अंगणवाडी सेविकेने प्रसूती वेदना सुरू होई पर्यंत आत्मनिष्ठा पुर्वक राष्ट्रसेवा बजावली आहे .बोर्लीपंचतन येथील बोर्ली मोहल्ला येथे कोरोना विषयी जनजागृती करत असताना त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या नंतर त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या महिला कर्मचारी रेश्मा राजू दिवेकर , ग्रीष्मा वेळास्कर, ज्योती खोत व सुनीता भायदे यांनी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले .सदर कर्तव्यदक्ष महिलेने एका मुलीस जन्म दिला असून मुलीचे वजन ०३ किलो आहे .सौ नंदिनी यांची त्यांच्या कामा विषयीची श्रद्धा व राष्ट्रप्रेम निश्चितच अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे .०४एप्रिल ला नंदिनी यांनी ००ते ०६ वयोगटातील बालके, स्तनदा माता , गर्भवती माता यांचा पोषण आहार स्वतः उतरवून घेऊन संबधित गरजू व्यक्तींच्या घरपोच केला आहे . तसेच प्रसूती पूर्व एक दिवस अखेर पर्यंत लसीकरणाच्या कामात सक्रिय सहभाग घेतला होता .राष्ट्रा विषयीची समर्पक भावना व्यक्त करणाऱ्या या माऊली ने सर्वांच्या समोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे . सौ नंदिनी यांचे पती अक्षय हे वाहन चालक आहेत .नंदिनी यांची प्रथम कन्या साक्षी इयत्ता चौथी च्या वर्गात शिकत आहे . नंदिनी यांनी २0१५ मध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून कामाला सुरुवात केली होती .त्यांच्याशी संवाद साधला असता आपण सर्वांनी कोरोना शी निर्भय होऊन लढा दिला पाहिजे .आज सर्व सरकारी कर्मचारी मोठया शिताफीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत .जनतेने फक्त घरात राहून सहकार्य करावे असे नंदिनी यांनी सांगितले .आज जग सर्व पातळीवर कोरोनाशी लढत आहे त्या युद्धात नंदिनी सारख्या लढवय्या स्त्री मानवी जीवनाचे मोल व चिवट पणा आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करत आहेत.नंदिनी ने आपल्या मातृत्वा सोबत आपल्या राष्ट्रत्वाला प्राधान्य दिले आहे .प्रसूती नंतर बालक व आई दोघांची प्रकृती सदृढ आहे .श्रीवर्धन तालुका प्रशासनातील प्रांताधिकारी अमित शेडगे , तहसीलदार सचिन गोसावी , गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे ,सभापती बाबुराव चोरगे , सरपंच नम्रता गाणेकर व मीना गाणेकर यांनी अभिनंदन व कौतुक केले .
Post a Comment