म्हसळा-वार्ताहर
रायगड जिल्हा परिषदेचे महिला बालविकास योजना समितीचे माध्यमातून एकात्मिक बाळ विकास प्रकल्प कार्यालय आणि पंचायत समिती म्हसळा यांचे मार्फत मेंदडी आदिवासी वाडी मधील गरजू व गरीब कुटूंबातील नवजात जन्माला आलेल्या बालकासाठी स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य रा.जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सभापती छाया म्हात्रे,माजी उपसभापती संदीप चाचले,प्रक्लप अधिकारी व्यंकट तरवडे,पर्यवेक्षीका पालवे,अरविंद बैनवाड आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.याच वेळी मेंदडी आदिवासी वाडीमध्ये जन्माला आलेल्या नवजातबालकांसाठी लागणारे हायपोथर्मिया किटचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
किट मध्ये बाळासाठी गादी लोडसह,स्वेटर,टोपी,पायमोजे,हातमोजे,दोन रुमाल झबले,टोपरे 6 नग,मुलायम चटई,बेबीपॅड 5 नग, हिमालया मॉलिश तेल, बेबी पावडर 2 नग,संतूर हॅन्ड वॉश,हिमालया साबण 4 नग,प्लास्टिक 2 नग, कॉटन रुमाल 2 नग आदि साहित्याचा समावेश आहे.मोफत साहित्याचा लाभ संगीता अजय जाधव,मंगला रुपेश वाघमारे,वंदना विश्वास जाधव यांना देण्यात आले.
कोरोना महामारीचे कार्यकाळात सर्वत्र लॉक डाउन असल्या कारणाने नवजात बालकांना अत्यावश्यक लागणाऱ्या वस्तु मिळत नाहीत हि गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या मोफत साहित्याचे वाटप म्हसळा एकात्मिक बाळ विकास प्रकल्प कार्यालय आणि पंचायत समितीने वेळीच हाती घेतल्याचे प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे यांनी माहिती देताना सांगितले.आयोजित स्तुत्य उपक्रमाचे नागरिक धन्यवाद देत आहेत.
Post a Comment