श्रीवर्धन पोलिसांचे ध्वज संचलन ; कोरोना संदर्भात जनजागृती


श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 
                 
  श्रीवर्धन तालुका प्रशासन कोरोना संदर्भात गँभीर असताना जनते कडून कायद्याचे पालन व्हावे तसेच कलम १४४ चा कुठे ही भंग होऊ नये .कायदा व  सुव्यवस्था अबाधित राहावी या साठी श्रीवर्धन पोलीस दला कडून  पोलीस ठाणे ते  नवीपेठ मार्गे  कुंभारवाडा,अय्यार मोहल्ला, वाणीआळी रोड,शिवाजी चौक, बाजारपेठ-,मोगल मोहल्ला, प्रभुअली,कासीमचौक, पेशवेआळी,जोशीनाका, टिळक रोड परत पोलीस स्टेशन असे कोव्हिड-१९ च्या अनुषंगाने ध्वज संचलन करण्यात आले. सदरच्या ध्वज संचलना करीता उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव पवार श्रीवर्धन पोनि.प्रमोद  बाबर , सपोनि.अली मुल्ला, पोसई.  प्रमोद खिरड व  २५ पोलीस कर्मचारी सामील झाले . सदरचे ध्वज संचलनाची ११:00 वाजता सुरु होऊन १२ :०० वाजता समाप्त झाले .सदर प्रसंगी पोलीस दला कडून सर्व सामान्य जनतेला विविध सूचना पोलीस दलाच्या वाहना वर बसवलेल्या स्पीकर द्वारे देण्यात आल्या .

कोरोना संदर्भात जनतेने कायद्याची बंधने पाळावीत .प्रशासनाला सहकार्य करावे व कोरोना निर्मूलनाच्या कार्यात सहभागी व्हावी ही विनंती .कायदा व सुव्यस्थेसाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे ....प्रमोद बाबर (पोलीस निरीक्षक श्रीवर्धन )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा