तळा नगरपंचायती मार्फत जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.कर्मचाऱ्यावर कौतुकाची थाप

तळा(किशोरपितळे)
७एप्रिल२०२०जागतिकआरोग्य  दिनानिमित्त तळा प्राथमिक केंद्राचे डाँ.अमोल बिरवाटकर याची प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी सर्व कर्मचारी , सफाई कर्मचारी  व पाणीपुरवठा कर्मचारी यांना कोरोना विषाणू बद्दल माहिती दिली व त्यापासून बचाव करण्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले डाँ.अमोल बिरवाटकर व मुख्याधिकारी श्रीम.माधुरी मडके यांच्या हस्ते सर्व सफाई कामगारांना मास्क, हँड ग्लोज , सँनिटायझर यांचे वाटप करण्यात आले.तसेच कोरोना
पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यानी प्रशासनास उत्तम प्रकारे  केलेलेसहकार्य निश्चितच अभिमानास्पद, गौरवास्पद असल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.तसेच जागतिक आरोग्य दिनानिमित्त नगरपंचायती मार्फत  सर्व कर्मचारी व सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा