म्हसळा बायपासच्या घातक वळणावर भराव,अपघाताला आमंत्रण : जे.एम.म्हात्रे इन्फ्रा कंपनी खाजगी जमीन मालकावर मेहेरबान

 
वरदहस्त कोणाचा नागरिकांमध्ये चर्चा

म्हसळा-बातमीदार

माणगांव दिघी रस्त्याच्या दुपदरीकरण कॉंक्रीटीकरणाचे काम लॉकडाउन असतानाही जे.एम.म्हात्रे इनफास्ट्रक्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडून शासनाचे सर्व नियम ढाब्यावर बसवून सुरु आहे.याच मार्गावर म्हसळा बायपास वर म्हसळा गौळवाड़ी आणि मदरसा जवळ एका खाजगी इसमाची जागा आहे.ही जागा मुख्य रस्त्यालगत असून खोलगट दरी आहे.वास्तविक पहाता मदरसा मध्ये धार्मिक शिक्षण घेणारे खूप छोटे छोटे विद्यार्थी असून त्यांना त्यांच्या दैनदिन व्यवहारासाठी शहरात याच मार्गावरून जावे यावे लागते.त्याच प्रमाणे म्हसळा गवळवाडीच्या सर्व नागरीकांच्या जमिनी,शेती याच भागात असण्याने शेतीची कामे आणि गुरे चरण्यासाठी याच मार्गावरून जावे लागते.खाजगी इसमाच्या जागेचा भराव हा जे एम म्हात्रे कंपनी  करून देत असल्याने वाहतुकीचा धोका भविष्यात फार मोठया प्रमाणात उदभवणार असून शासनाने त्वरित या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रकार थांबवीणे अत्यावश्यक असल्याचे या भागातील नागरिकांची मागणी जोर धरीत आहे.अशा प्रकारे खाजगी इसमाला भराव करून देत असताना सामाजिक कार्यासाठी कंपनीची मदत लागल्यास त्यास कंपनी टाळाटाळ करत आहे. कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी मालकांचे ऐकून स्थानिकांना सातत्याने डावळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. हजारो टन मातीचा उत्खनन होऊन रस्त्याच्या नावाखाली भराव सुरू असताना महसूल विभाग अर्थपूर्ण डोळेझाक करताना दिसून येत असल्याची चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा