( म्हसळा प्रतिनिधी )
शालेय पोषण आहार योजनेअंर्तगत शाळांमध्ये शिल्लक असलेला, तांदूळ, डाळी व कडधान्याचा साठा शाळेतील विद्यार्थी / पालकाना वितरीत करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिल्याने म्हसळा तालुक्यातील ११० शाळांतील ३१५६ विद्यार्थांनाr१५३.७३ (व्कींटल) तांदूळ, व ३५.३४ (व्कींटल) डाळीचा साठा संबंधीत विद्यार्थी व पालकाना शाळा व्यवस्थापन समीतीच्या माध्यमांतून देण्यात आल्याची माहीती म्हसळ्याचे गट शिक्षण अधिकारी संतोष शेडगे यानी दिली. कोरोना विषाणू (COVID-१९)च्या पार्श्वभूमीवर १८ मार्च पासून १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन आहे. त्या कालावधीत राज्यातील विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने शालेय पोषण आहार विद्यार्थाना देणे आवश्यक असल्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतल्याने तांदूळ व धान्य विद्यार्थी व पालकाना वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शेडगे यानी सांगितले. तालुक्यातील म्हसळा १२,कणघर. ९ , वरवठणे १२, चिखलप ११पाभरे १२ .आडी ७, संदेरी १२, पाष्टी १२,आमशेत ९ ,मेंदडी ६,नेवरूळ ८ अशा तालुक्यातील ११० शाळांतील ३१५६ विद्यार्थां/ पालकाना धान्याचे वाटप करण्यात आले. शोळचे चेअरमन समीर बनकर ,शिक्षक एकनाथ पाटील, मंगेश कदम,दिपक सुर्यवंशी ,उध्दव खोकले सर, दिलीप भायदे, गांगुर्डे सर, सहारे ,शिपाई जंगम, देवमन गहला पालकबाळाराम गाणेकर, दत्ताराम गाणेकर, साहिल जंगम, मोहन वाघे, प्रकाश पवार, लक्ष्मण पवार, सागर लाल गुप्ता, सुनिल टिंगरे, विजय खताते, प्रविण खताते, नरेश घडशी आदी मंडळी उपस्थित होती.
Post a Comment