म्हसळा तालुक्यात “संत निरंकारी” मंडळा कडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप



म्हसळा : सुशील यादव 
“संत निरंकारी” मंडळाच्या रायगड झोन ४० च्या अंतर्गत शाखा म्हसळा च्या वतीने म्हसळा तालुक्यातील आठ गावांमधील गरजूंना शुक्रवारी(१७ एप्रिल)जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. म्हसळा तालुक्यातील म्हसळा शहर, देवघर, सकलप, देवघर कोंड, कानसेवाडी , ढोरजे, देहेनगाव, देहेन नर्सरी अशा आठ गावातील गरजू कुटुंबाना तांदूळ , डाळ , हरभरा, खाद्यतेल, साखर , चहा पावडर, कांदे बटाटे, मीठ अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम ‘संत निरंकारी” मंडळाचे रायगड जिल्हा झोनल प्रमुख प्रकाश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी म्हात्रे यांच्या समवेत रवींद्र अंबावकर, हिरामण चव्हाण, शरद चव्हाण, सुनील विचारे, हरिचंद्र कानसे, व नेताजी कोरे यांच्या हस्ते या सर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा सर्व कार्यक्रम सरकारने दिलेल्या निर्देशानुसार सोशियल डीस्टन्सिंग चे पालन करीत अतिशय शांतेत पार पाडण्यात आला.   

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा