म्हसळा वार्ताहर
सध्या देशावर करोना सारख्या गंभीर महामारीचे प्रादुर्भाव असून सुध्दा महावितरणचे अधिकारी व कर्मचारी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून ग्राहकांना सेवा बजावताना दिसून येत आहेत याचे जनतेकडून कौतुक होत आहे.
तालुक्यात सध्या ५० टक्के कर्मचारी व अधिकारी यांची कमतरता आहे. त्यातच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस यामुळे वीजपुरवठा खंडित होत असताना तत्काळ बिघाड दुरुस्त करत सेवा देऊन ग्राहकांची मने जिंकली आहेत.
त्याचप्रमाणे साळविंडे ताडाची वाडी येथे महावितरणचे विद्युत फ्यूज अगदी लहान मुलांचेही हात पोहोचतील एवढ्या उंचीवर आणि मोडक्या आधाराच्या साहाय्याने लावले होते.या तक्रारीची तत्काळ दखल घेत, योग्य दुरुस्ती करून कोणाचे हात पोहचणार नाही अशा उंचीवर बसवण्यात आले यामुळे ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या कर्मचारी- अधिकारी वर्गाचे आभार मानले.
Post a Comment