"मीच माझा रक्षक" तळा नगरपंचायतीची रस्त्यावर घोषवाक्य लिहून जनजागृती ; निर्जंतूकीकरण कक्षाचे उद्घाटन.


तळा(किशोर पितळे)
तळा नगरपंचायतीच्यानगराध्यक्षा रेश्मा मुंढे, मुख्याधिकारी माधुरीमडके,उपनगराध्यक्षा सायलीताईखातूनगरसेवक,नगरसेविकायांच्यासंकल्प नेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळा नगरपचायतीची शहराच्या मध्यवर्ती रस्त्यावर मीच माझा रक्षक,ससंर्ग टाळा,कामाशिवाय बाजारात येत असाल तर आपले आरोग्य आपले कुटुंब धोक्यात आणत आहात घरातून कोरोना टाळूयाअशा कोरोनाप्रतिबंधात्मकपार्श्वभूमीवर
सुवाच्च अक्षरातील संदेश पादचारी,वाहन चालक, नागरिकांचे लक्ष वेधत आहेत.अशी जनजागृती केली आहे.प्रशासन कोरोना रोगाचे समूळ उच्चाटन व्हावे या उद्देशानेचमोठ्याप्रमाणावरविविधप्रकारच्यामाध्यमातून प्रयत्न केलेजात आहेत.संपूर्ण शहरातील व प्रत्येक वार्डातून जंतुनाशक फवारणी,साफसफाई, केली जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून शहरात सँनटायझेशन फवारे कक्ष उभारण्यात आला आहे.त्याचे उद्घाटन तळा तहसीलदार अण्णापा कनशेट्टी,यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी माधुरी मडके, नगराध्यक्षा रेश्मा मुंढे,पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे  महेेंंद्र कजबजेआदी मान्यवराच्या उपस्थितीतकरण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे यांनी जनतेला संबोधित करताना सांगितले की तळा राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षेच्या दृष्टीने  
रायगड जिल्हाधिकारी यांनी खबरदारीचा उपायम्हणून जिल्ह्यात निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्याचे आदेश दिले त्याची अंमलबजावणीतळा शहरात नगरपंचायती कडून निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे तरी नागरिकांनी त्याचा वापर करावा.
काळजीघ्या,घरी रहा सुरक्षितरहा नियमांचे पालनकरा.
पोलीस,प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ देऊ नका.आपला जीव धोक्यात घालून आज डॉक्टर, पोलिस,सफाई कर्मचारी,पाणी पुरवठा विभाग,सर्व कार्यरत कर्मचारी यांच्यासाठी तरी कृपया घरात रहा.घाबरून जाऊ नका,सतर्क रहा या निर्जंतूकीकरण कक्षाचा वापर करताना हात वर करा,डोळे बंद करा मास्क काढू नका लहान मुलांची काळजी घ्या असे आवाहन केले तळा शहरातील बळीचा नाका येथे या निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली त्या शेजारी कक्षात प्रवेश करताना हात वर करून चालावे, चालताना वर बघु नये,मास्क काढू नये, कक्षातून जाताना डोळे बंद ठेवा, व लहान मुलांची काळजी घ्यावी आशा महत्वाच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले आहे.तसेच शहरातील काही प्रमुख ठिकाणी नागरिकांना हाथ धुण्यासाठी नळ आणि हँडवॉशची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.या सुविधांचा जास्तीतजास्त नागरिकांनी वापर करून कोरोना विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन नगरपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा