स्वयंम शिस्त हाच कोरोनाचा प्रतिबंध होय ...डॉ अमोल भुसारे (मानसोपचार तज्ञ )
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
आज सर्वत्र कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे मात्र वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्वच लोकांनी पुर्ण शक्तींनी कोरोनाचा सामना केला आहे .वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व व्यक्तींनी स्वयंम शिस्त आचरणात आणणे अगत्याचे आहे कारण आपण सर्वांना कोरोना पासून वाचवत आहोत मात्र त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ नये या साठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे डॉ अमोल भुसारे मानसोपचार तज्ञ अलिबाग यांनी प्रतिपादन केले .रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सुचने नुसार श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी कोरोना आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे आयोजन श्रीवर्धन मधील सरकारी विश्रामगृहात करण्यात आले .सदर प्रसंगी रायगड जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ सुचिता गवळी , डॉ अमोल भुसारे ,उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ मधुकर ढवळे व डॉ एम जी भरणे यांनी उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले .डॉ अमोल भुसारे यांनी कोरोना रुग्णांना उपचार करत असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काय काळजी घ्यावी या विषयी सविस्तर माहिती दिली .डॉक्टर हा सुद्धा माणूसच आहे इतरांची विविध आजारा पासून काळजी घेण्याची दायित्व त्यांच्यावर आहे तसेच डॉक्टर ने स्वतः ची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे .आपण कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना परिधान केलेला ड्रेस उपचारा अंती व्यवस्थित काढणे गरजेचे आहे कारण विषाणू हा कपड्यावर सुद्धा असू शकतो तसेच डोळ्यावर लावलेला चष्मा , खिशातील भ्रमणध्वनी याची सुद्धा काळजी घ्यावी अन्यथा विषाणूच्या संसर्गाचा धोका निर्माण होतो .असे डॉ भुसारे यांनी सांगितले .कोरोना विषाणू चा सामना करण्यासाठी आपण सर्व जण सज्ज आहोत परंतु या सज्जते सोबत आपण आपल्या समोरील रुग्णांच्या उपचार समयी योग्य स्वयंम शिस्त व काळजी अभिप्रेत आहे .आपण सर्व जण एकोप्याने कोरोनाचा निश्चितच पराभव करू व मानवतेला विजय मिळवून देऊ असे डॉ अमोल भुसारे यांनी सांगितले .सदर शिबिरासाठी
उपजिल्हा रूग्णालय श्रीवर्धन, जसवली, ग्रामीण रुग्णालय म्हसळा, प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली, प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवटी, प्राथमिक आरोग्य पथक बागमांडला, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा येथील वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते .
Post a Comment