म्हसळा -वार्ताहर
तालुक्यात ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी नागरिकांना बचतीचे माध्यमातून रोजगार उद्योगासाठी छोटे मोठे अर्थसहाय्य करणारी तसेच सामाजिक सेवेत कार्यरत असणारी व अल्पवधीतच मोठे भांडवल उभारून बँकींग क्षेत्रात नावलौकिक झालेली शिवकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म्हसळाने राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावावर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाला कोव्हीड-19 करीता 25000 रुपयांचे मदतीचा हात देवु केला आहे.
राज्य शासन कोरोना बाधित रुग्णांना मोफत उपचार करीत आहे आधीच देशात व राज्यात आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असल्याने राज्य शासनाने दानशूर मंडळीना अर्थ सहाय्य करण्याचे आवाहन केले असल्याने कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक दानशूर मंडळी मोठ मोठया रकमांची मदत देत आहे.
या मदतीत आपलाही खारीचा वाटा असावा या स्तुत्य हेतूने सामाजिक भावनेतून शिवकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थे मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 करिता आर्थिक सहाय्याचा धनादेश संस्थेचे व्हा.चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,माजी चेअरमन शैलेशकुमार पटेल,शाखा व्यवस्थापक सुजित पोटले यांनी म्हसळा नायब तहसीलदार के. टी.भिंगारे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
Post a Comment