म्हसळ्यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार : आरोपीच्या मुसक्या पोलीसानी आवळल्या



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळ्या पासून ७ कि.मी. अंतरावरील चिचोंडे येथील एका युवकाने अल्पवयीन युवतीस लग्नाचे आभिष दाखवून सदर युवती जवळ शारीरीक संबध ठेवले व आता लग्न करण्यास नकार देत आसल्याने सदर युवतीने (वय१८,व्यवसाय घरकाम) सध्या रहाणार कुलाबा (मुंबई) व मूळ रहाणार चिचोंडा ता. म्हसळा हीने कुलाबा पोलीस स्टेशन येथे तक्रार केल्याने म्हसळा पोलीस स्टेशनला गुन्हा वर्ग झाला म्हसळा पोलीसानी गु.र.नं.१६/२०२० भादवी ३७६ बलात्कार,बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४,६,८ प्रमाणे गुन्हा नोंदवून आरोपी श्रीकांत श्रीपत बोर्ले वय २६ याला अटक केली आहे. याबाबत सविस्तर हकीगत अशी की चिचोंडा येथील युवती व त्याच गावातील युवक श्रीकांत यांचे प्रेम प्रकरण मागील तीन वर्षांपासून सुरु होते, मुलीच्या अल्पवयाचा व चांगुलपणाचा फायदा घेत सदर मुलीला युवक पाभरे येथील जंगल व परीसरांत ऑगस्ट -सप्टें.२०१९ या कालावधीत फिरायला नेत असे त्याच वेळी आरोपीने लग्नाचे आभिष दाखवून एकांताचा फायदा घेत युवती जवळ शारीरीक संबध ठेवले, अनेक वेळा शरीर संबंध ठेऊनही आता लग्न करण्यास नकार दिल्याने सदर युवतीने तक्रार दाखल केली म्हणून आरोपीच्या मुसक्या अवळून अटक करण्यात आल्याचे तपासी अधिकारी व म्हसळा स.पो.नी.धनंजय पोरे यानी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा